चावा घेत कान तोडून केला महिलेचा विनयभंग, दिंडोरी रोडवरील धक्कादायक प्रकाराने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 15:06 IST2022-11-04T15:06:00+5:302022-11-04T15:06:27+5:30
संशयिताने घटनास्थळावरून काढला पळ.

चावा घेत कान तोडून केला महिलेचा विनयभंग, दिंडोरी रोडवरील धक्कादायक प्रकाराने खळबळ
नामदेव भोर
नाशिक : शहरातील दिंडोरी रोडवर एका महिलेला रस्त्यात अडवून बळजबरीने अंगलट करण्याचा प्रयत्न करीत गालाला तसेच उजव्या कानाला जोराचा चावा घेत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. महिलेच्या आवाजाने परिसरातील नागरिक जमण्याचे भीतीने संशयित पिंटू गौतम याने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी रोड भागात एका महिलेला संशयित पिंटू गौतम याने ओळखीचा फायदा घेत रस्त्यात अडवून तिच्याशी बळजबरी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या गालाला व उजव्या कानाला जोराचा चावा घेतला. यावेळी पीडित महिलेने प्रतिकार केल्यामुळे असता संशयिताने तिच्या डाव्या कानालाही जोरदार चावा घेतला. संशयित महिलेला एवढा जोरात चावला की या कृत्याने महिलेच्या कानाचा तुकडा पडल्याने ती गंभीर जखमी झाली.
यावेळी महिलेच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक जमवण्याचे भीतीने संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे बचावलेल्या पीडित महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित पिंटू गौतम विरोधात विनयभंग तसेच गंभीर जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.