ओझर येथील महिलेला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:09 AM2017-07-21T00:09:49+5:302017-07-21T00:10:04+5:30

पोलिसांत तक्रार : पावणेदोन लाखांची ‘फिल्मीस्टाइल’ फसवणूक

A woman from Ozar | ओझर येथील महिलेला गंडा

ओझर येथील महिलेला गंडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ओझर : येथील उपनगरांमध्ये ब्यूटिपार्लर चालविणाऱ्या महिलेला लंडनमधील युवकाने तब्बल पावणेदोन लाखांना गंडा घातला आहे.
पतीशी मतभेद होत असल्याने सध्या आपल्या आईवडिलांकडे राहणार्या या महिलेने लग्नासाठी एका आॅनलाइन विवाहसंस्थेच्या संकेतस्थळावर प्रोफाइल लोड केले. तरुणी वरांची माहिती बघत असताना लंडन येथील मिचल ससोन क्र ेग नामक इसमाने मोबाइलवरून महिलेला फोन करत व्हाट्सअ‍ॅपने संवाद साधणे सुरू केले. बोलणे सुरु झाल्यावर मिचेलने त्याची पत्नी मयत झाली असून, मला सारा नावाची पाच वर्षांची मुलगी असल्याचे सांगितले. मी लंडन येथेच स्थायिक आहे असे सांगून त्याने कंपनीत उच्च पदावर असल्याचे सांगितले. काही दिवसांनी मी व आई दोघे तुला भेटायला ओझर येथे येणार असून घराचा पत्ता विचारला. या महिलेने पत्ता दिल्यानंतर त्याने कुरिअरद्वारे भेटवस्तू पाठवल्याचे सांगितले.
दोन दिवसांनी दिल्ली येथून डेल्टा कुरिअर सर्व्हिसमधून श्वेता नावाच्या मुलीचा फोन आला. तिने पार्सल सोडवण्यासाठी ४२५०० रक्कम बँक खात्यावर भरावी लागेल असे सांगितले. महिलेने रक्कम बँकेत टाकल्यानंतर श्वेताने पार्सल सोडवण्यासाठी १ लाख २५ हजार रु पये भरून पार्सल सोडून घ्या असे उत्तरे देऊन वेळ मारून नेली. सदर महिलेने पुन्हा पैसे जमा करत श्वेताशी संपर्क झाल्यानंतर तिने सदर चलन भारतात चालणार नसून ते विमानतळ येथेच बदलावे लागेल असे सांगून पुन्हा ७५ हजारांची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस स्टेशनकडे धाव घेत आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार केली. तब्बल १ लाख ६७ हजार ५०० रूपयांची फसवणूक केलेल्या अज्ञात बंटीबबलीचा शोध पोलीस घेत असून, या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट करत आहे.झालेली फसवणूक लक्षात घेता भविष्यात असे प्रकार होऊ नये म्हणून सतर्क राहावे. तोंडी विश्वास ठेवण्यापेक्षा खोलवर माहिती घेऊन निर्णय घ्यावा. अनेक जण सोप्या मार्गाने पैसे कमवण्यासाठी खोटी माहिती देऊन व भुरळ टाकून फसवणूक करतात, अशापासून सावधान असायला हवे. - श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक, ओझर

Web Title: A woman from Ozar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.