अशोकामार्गावर महिलेची सोनसाखळी खेचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:13 PM2020-02-12T23:13:40+5:302020-02-12T23:49:10+5:30

अशोकामार्गावरील मेडिकलमधून औषधे घेऊन रुग्णालयाकडे पायी जाणाऱ्या परजिल्ह्यातील पाहुण्या आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळवारी (दि.११) रात्री दहा वाजेच्या सुमारास हिसकावून पळ काढला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The woman pulled the gold chain on the Ashoka route | अशोकामार्गावर महिलेची सोनसाखळी खेचली

अशोकामार्गावर महिलेची सोनसाखळी खेचली

googlenewsNext
ठळक मुद्देरायडर्सचाही उपद्रव : पोलीस गस्त अन् हवी नाकाबंदी

नाशिक : अशोकामार्गावरील मेडिकलमधून औषधे घेऊन रुग्णालयाकडे पायी जाणाऱ्या परजिल्ह्यातील पाहुण्या आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळवारी (दि.११) रात्री दहा वाजेच्या सुमारास हिसकावून पळ काढला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशबाबानगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाइकांची विचारपूस करण्यासाठी राहाता येथून श्वेता व्यंकटेश चिस्ते (२९) या आल्या होत्या. रात्रीच्या सुमारास रुग्णालयातून औषधे घेण्यासाठी त्या बाहेर पडल्या.
गणेशबाबा मंदिरापासून पुढे येत मुख्य अशोकामार्गाच्या दुभाजक पंक्चरच्या जवळ आल्यानंतर त्यांनी जवळच्या मेडिकलमधून औषधे घेतली व पुन्हा पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला हिसका देत सोनसाखळी खेचली. त्यांनी आरडाओरड केली असता परिसरातील नागरिकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. यावेळी चोरट्याने सोनसाखळी तोडल्याने पेंडल रस्त्यावर पडल्याचे श्वेता यांना दिसले, मात्र त्या पेंडलची ३० ग्रॅम सोन्याची साखळी घेऊन चोरट्याने पोबारा केला.
श्वेता यांच्या फिर्यादीनुसार ३० हजार रुपयांची सोनसाखळीची चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वीस दिवसांत दुसरी घटना; महिलांमध्ये भीती
अशोकामार्ग परिसरात दरमहा एकतरी सोनसाखळी चोरीची घटना घडत असल्याने महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशोका चौफुली सिग्नलवर पोलीस चौकी असूनदेखील चोरटे सर्रासपणे अशोकामार्गावर सोनसाखळी चोरी करत असल्याचे महिलांनी सांगितले. रात्रीच्या वेळी शतपावली करण्यासाठी तसेच संध्याकाळच्या वेळी महिलांची अशोकामार्गावर गर्दी असते.
४एलईडी दिव्यांनी हा रस्ता उजळून निघाला असला तरी चोरटे सर्रासपणे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावत असल्याने महिलांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. २१ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अशोकामार्गावरच आदित्यनगरजवळ स्मिता महेश कुलथे या महिलेची १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून पळ काढला होता. वीस दिवसांनंतर ही दुसरी घटना या भागात घडली आहे.

Web Title: The woman pulled the gold chain on the Ashoka route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.