मेकअप क्लासचालकाकडून गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 01:57 AM2022-03-12T01:57:33+5:302022-03-12T01:58:36+5:30
एन. ललित मेकअप क्लासेसचा संचालक संशयित ललित निकम याने मे २०१९ मध्ये कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.१०) पीडिताच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात ललित निकम याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असून, न्यायालयाने त्याची तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
नाशिक : एन. ललित मेकअप क्लासेसचा संचालक संशयित ललित निकम याने मे २०१९ मध्ये कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.१०) पीडिताच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात ललित निकम याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असून, न्यायालयाने त्याची तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
पोलीस सूत्रानुसार, एन. ललित मेकअप क्लासचा संचालक ललित निकम याने मे २०१९ मध्ये त्याच्याकडे कामानिमित्त आलेली पीडित महिला हॉटेल पंचमजवळ त्याच्याच कारमध्ये बसलेली असताना तिला गुंगीचे औषध असलेले कोल्ड्रिंक पाजले. त्यानंतर आर्चिज गॅलरीच्यामागे पराग अपार्टमेंटमधील तळमजल्यावरील त्याच्या सलूनमध्ये नेऊन फिर्यादी पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे फोटोही काढले. ते फोटो पीडितेला दाखवून तिच्या पतीलाही दाखविण्याची धमकी देत मे २०१९ पासून वांरवार शारीरिक संबंध तसेच जबरी अनैसर्गिक कृत्य केले. त्यातून पीडित महिलेला मे २०२१ मध्ये गर्भधारणाही झाली होती. मात्र, आरोपीने २८ जुलै २०२१ गंजमाळ येथील वाघ हॉस्पिटल येथे डॉ. वाघ यांना पीडित महिला ही पत्नी असल्याचे सांगतानाच कागदपत्रांत तशी नोंद करून महिलेला तिच्या इच्छेविरोधात स्वाक्षरी करण्यास भाग पाडून गर्भपात घडवून आणला. या गुन्ह्यात संशयिताला त्याची पत्नी नेहा निकम, मित्र जयश वाघ व त्याची पत्नी, ज्योती वाघ यांनी पीडित महिलेला धमकावून हा गर्भपात घडवून आणला. त्यानंतरही ललित निकम याने पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. परिणामी पीडिता पुन्हा गर्भवती राहिली. त्यामुळे पीडितेने अखेर गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेत ललित निकमविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी त्याला अटक करून शुक्रवारी (दि.११) न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याची तीन दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बैसाणे करीत आहेत.