महिलेला बळजबरीने रिक्षात बसवून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 01:07 AM2019-04-02T01:07:00+5:302019-04-02T01:08:23+5:30

पेठरोड परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय विवाहितेला बळजबरीने रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून रिक्षामध्ये बसवून येथील शरदचंद्र पवार बाजार समितीमध्ये नेऊन दोघा नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१) सकाळी उघडकीस आली.

The woman was forced to torture at a helicopter rickshaw | महिलेला बळजबरीने रिक्षात बसवून अत्याचार

महिलेला बळजबरीने रिक्षात बसवून अत्याचार

Next
ठळक मुद्देदोघांना अटक : गस्त पथकाचे दुर्लक्ष भोवले

पंचवटी : पेठरोड परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय विवाहितेला बळजबरीने रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून रिक्षामध्ये बसवून येथील शरदचंद्र पवार बाजार समितीमध्ये नेऊन दोघा नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पीडित महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, रविवारी रात्रीच्या सुमारास विवाहिता पायी जात असताना तिला दोघांनी अडवून बळजबरीने रिक्षा (एमएच १५, एफयू ३२७४) मध्ये ओढले. पेठरोडवरील बाजार समितीच्या परिसरात महिलेवर बलात्कार केला. तेथून पुन्हा पीडितेला रिक्षातून मखमलाबाद शिवारातील एका बांधकामाच्या ठिकाणी नेऊन पुन्हा अत्याचार केले. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी बाळू नारायण तायडे व त्याचा पेठरोडवरील पवार मळा येथील साथीदार रिक्षाचालक दिगंबर विठोबा कुंदे या दोघांना अटक केली आहे.
‘त्या’ पोलिसांचा निष्काळजीपणा
रविवारी (दि.३१) पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयावरून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा अडविल्याचे समजते. यावेळी संशयिताने पीडितेला स्वत:ची पत्नी असल्याचे सांगितले तसेच पोलिसांना ‘चहापाणी’ दिल्याची चर्चा असून, संबंधित पोलिसांनी कर्तव्यदक्षता दाखविली असती तर पीडितेची वेळीच सुटका झाली असती असे बोलले जात आहे.

Web Title: The woman was forced to torture at a helicopter rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.