कानळदला विद्युत तार अंगावर पडून महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 07:24 PM2021-03-15T19:24:25+5:302021-03-16T00:32:25+5:30
विंचूर : कानळद ता.निफाड येथील गावठाण परिसरात शुक्रवारी (दि.११) विद्युत तार अंगावर पडून यशोदाबाई देवचंद जाधव (६५) यांचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्या प्रकरणात लासलगाव पोलिसांनी चौकशी करून ग्रामपंचायत सदस्य व जेसीबी चालक यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कानळद गावठाण परिसरात स्मशान भूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील बाभळीचे झाडे कोणतीही परवानगी न घेता तोडली जात होती, या ठिकाणी वीज कंपनीच्या पोलवर झाड पडले. त्याच्या तारा यशोदाबाई यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा भाजून मृत झाला.
याबाबत त्यांचा मुलगा मच्छिंद्र यांच्या फिर्यादीवरून ग्रामपंचायत सदस्य शांताराम जाधव व जेसीबी चालक (नाव माहीत नाही) यांच्यावर कलम ३०४ नुसार सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहा. पोलीस निरीक्षक रमेश जोपळे, पोलीस हवालदार ठोंबरे यांनी दिली.