दुचाकीचोर निघाल्या युवती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 01:04 AM2017-09-26T01:04:03+5:302017-09-26T01:04:10+5:30
शहरातील वाढत्या दुचाकीचोरीच्या घटनांमुळे चोरट्यांची टोळीच कार्यरत असल्याचे वारंवार बोलले जात असताना आणि काही संशयित तरुण ताब्यातही घेतले जात असताना दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. दुचाकीचोरीमध्ये केवळ मुलेच नाही तर मुलींचाही सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. पार्श्वभूमीवर चोरट्यांचा तपास करीत असताना यामध्ये दोन युवतींचा सहभाग समोर आला असून, शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने या दोन युवतींसह एका संशयितास अटक केली आहे़
नाशिक : शहरातील वाढत्या दुचाकीचोरीच्या घटनांमुळे चोरट्यांची टोळीच कार्यरत असल्याचे वारंवार बोलले जात असताना आणि काही संशयित तरुण ताब्यातही घेतले जात असताना दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. दुचाकीचोरीमध्ये केवळ मुलेच नाही तर मुलींचाही सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. पार्श्वभूमीवर चोरट्यांचा तपास करीत असताना यामध्ये दोन युवतींचा सहभाग समोर आला असून, शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने या दोन युवतींसह एका संशयितास अटक केली आहे़ शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक शेख जाकिर हुसेन हे दुपारी गस्त घालीत होते़ जिल्हा रुग्णालयाजवळ विनानंबरची मॅस्ट्रो दुचाकी दिसली़ त्यांनी सदर वाहनचालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले असता तो संशयित कुणाल माळी असल्याचे समोर आले़ त्यांनी गाडीचा चेसी व इंजिननंबरवरून मूळमालकाचा शोध घेतला असता एसएमआरके महाविद्यालयाच्या पार्किंगमधून चोरीस गेल्याचे तसेच याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले़ पोलिसांनी माळीची पोलीस स्टाइलने चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरणाºया दोन मुलींची नावे सांगितली़ गुन्हे शाखेने सापळा रचून या दोन्ही युवतींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली़ या तिघांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक गिरमे, जाकीर शेख,असिफ तांबोळी, संतोष कोरडे, प्रतिभा पोखरकर, दीपक जठार यांनी ही कामगिरी केली़
पेट्रोल चोरीत सहभाग
दुचाकीचोरीच्या घटनेत मुलींचा सहभाग आता समोर आला असला तरी पेट्रोल चोरीत अनेक युवती असल्याची चर्चा यापूर्वीच शहरात सुरू आहे. विशेषत: हॉस्टेलमध्ये राहणाºया मुली व्यावसायिक संकुलातील पार्किंगमधील दुचाकींमधून पेट्रोल चोरीत असल्याची चर्चा आहे, तर काही दिवसांपूर्वी एका रहिवासी इमारतीच्या पार्किंगमधील दुचाकीमधून युवती मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोल चोरी करीत असल्याचे उघड झाले होते.