महिला माहेरला मुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:32 AM2017-10-20T00:32:35+5:302017-10-20T00:32:40+5:30
संपाचा परिणाम : बाहेरगावी जाण्याचे नियोजन रद्द नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. दिवाळी भाऊबीज सणासाठी माहेरी येणाºया आणि माहेरी जाणाºया गृहिणींच्या अडचणी वाढल्या असून, माहेरवाशिणींना ऐन दिवाळीत माहेरला मुकावे लागणार आहे. याशिवाय अनेकांनी सुटीत बाहेरगावी जाण्याचे नियोजन रद्द केले आहे.
संपाचा परिणाम : बाहेरगावी जाण्याचे नियोजन रद्द
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. दिवाळी भाऊबीज सणासाठी माहेरी येणाºया आणि माहेरी जाणाºया गृहिणींच्या अडचणी वाढल्या असून, माहेरवाशिणींना ऐन दिवाळीत माहेरला मुकावे लागणार आहे. याशिवाय अनेकांनी सुटीत बाहेरगावी जाण्याचे नियोजन रद्द केले आहे.
दिवाळी म्हटले की, सुट्यांचा काळ मानला जातो. या कालावधीत नागरिक सण साजरा करण्यासाठी मूळ गावी किंवा आप्तेष्टांकडे जातात. याशिवाय माहेरवाशिणीदेखील माहेरी जातात किंवा येतात. परंतु यंदा या सर्व नियोजनावर पाणी फेरले गेले आहे.
सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एसटी चालक-वाहकांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे दिवाळी सणासाठी आणि भाऊबीजेसाठी येणाºया-जाणाºया महिलांना या संपाचा फटका बसला आहे. लहान मुलांनाही शाळेला सुट्या लागल्याने त्यांना आप्तेष्टांकडे गावी जाता येत नसल्याने पालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर दिवाळीनिमित्त चार-पाच दिवसांच्या सुटीत बाहेरगावी जाण्याचे नियोजनदेखील कोलमडले आहे. ऐन सणासुदीच्या काळात एसटी चालक-वाहकांनी पुकारलेल्या संपाबाबत जनसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. चालक-वाहकांना वेतन वाढ मिळाली पाहिजे, याविषयी दुमत नाही मात्र त्यासाठी सामान्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची भावनादेखील व्यक्त केली जात आहे. या संपामुळे एकूणच जनजीवन विस्कळीत झाले आहे.महामंडळाच्या कार्यालयात धावदिवाळी सणासाठी बाहेरगावी जाऊ इच्छिणाºया नागरिकांनी एसटी बसचे आरक्षण करून ठेवले होते. या संपामुळे बाहेरगावी जाणे शक्य नसल्याचे समजताच केलेले आरक्षण रद्द करून आरक्षणाचे पैसे परत मिळावेत म्हणून महामंडळाच्या कार्यालयात धाव घेण्यास सुरु वात केली आहे. संप कधीही मिटला तरी इच्छितस्थळी वेळेवर पोहचता येणार नसल्याने बºयाच लोकांनी बाहेरगावी जाण्याचे नियोजन रद्द केले आहे.