सिन्नर बसस्थानकातून महिलेची पोत लांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:15 AM2021-02-11T04:15:17+5:302021-02-11T04:15:17+5:30
बेवारस, अपघातग्रस्त वाहनांचा होणार लिलाव सिन्नर: तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेली अपघातग्रस्त व बेवारस स्थितीत आढळून आलेल्या दुचाकींचा ...
बेवारस, अपघातग्रस्त वाहनांचा होणार लिलाव
सिन्नर: तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेली अपघातग्रस्त व बेवारस स्थितीत आढळून आलेल्या दुचाकींचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी दिली. अनेक दिवसांपासून अपघातग्रस्त दुचाकी व बेवारस आढळून आलेल्या दुचाकी पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. संबंधित मालकांनी हक्काबाबत दुचाकींची कागदपत्रे दाखवून वाहने घेऊन जावीत, अन्यथा या वाहनांचा लिलाव केला जाणार असल्याचे कोते यांनी सांगितले.
वाचनालयास स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट
सिन्नर : येथील सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष नरेंद्र वैद्य यांनी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारी २७०० रुपये किमतीची २३ पुस्तके वाचनालयास भेट दिली. अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी पुस्तकांचा स्वीकार केला. सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे यांच्या हस्ते वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बापू वैद्य, युगंधर वैद्य, कार्यवाह हेमंत वाजे, संचालक चंद्रशेखर कोरडे, राजेंद्र देशपांडे, जितेंद्र जगताप, सागर गुजर, मनीष गुजराथी, विलास पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते.
गहिणीनाथ मंडळाच्या अध्यक्षपदी सोमवंशी
सिन्नर: तालुक्यातील वारेगाव येथील गहिनीनाथ मित्र मंडळ पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली. या संबंधित बैठक गहिणीनाथ मंदिरात पार पडली. यावेळी मंडळाच्या अध्यक्षपदी प्रमोद नारायण सूर्यवंशी, उपाध्यक्षपदी श्याम दिलीप चिने, तर खजिनदारपदी वैभव गव्हाणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उद्वव पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
कोकणवाडी बस वेळेवर सोडण्याची मागणी
सिन्नर: सिन्नर ते कोकणवाडीसाठी असलेली बस वेळेवर सोडावी, अशी मागणी शालेय विद्यार्थी व प्रवाशांकडून केली जात आहे. सिन्नरहून कोकणवाडी जाण्यासाठी सायंकाळी पाच वाजताची बस ही सायंकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या सुमारास सुटते. या गावातून शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थी येतात. बस वेळेवर सुटत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. सदर बस वेळेवर सोडण्याची मागणी गायत्री अस्वले, छाया खोकले, रुपाली खोकले यांच्यासह विद्यार्थ्यांनी केली आहे.