बसप्रवासात महिलेची रोकड लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 05:08 PM2019-01-01T17:08:39+5:302019-01-01T17:09:46+5:30

नाशिक : बसप्रवासात महिलेच्या पर्समधून साडेचौदा हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि़३१) सकाळी नाशिकरोड बसस्थानकावर घडली़

 Woman's cash lapses | बसप्रवासात महिलेची रोकड लंपास 

बसप्रवासात महिलेची रोकड लंपास 

Next
ठळक मुद्दे पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल

नाशिक : बसप्रवासात महिलेच्या पर्समधून साडेचौदा हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि़३१) सकाळी नाशिकरोड बसस्थानकावर घडली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील सेंट्रल रेल्वे कॉलनीतील रहिवासी सीमा सुरेश गायकवाड (रा. बिल्डिंग नंबर २८०, भातनकर मार्ग, परळ स्टेशनजवळ) या सोमवारी सकाळी नाशिकरोड बसस्थानकावरून कोपरगावकडे जाणाऱ्या बसमध्ये बसल्या होत्या. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून रोकड चोरून नेले़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

महिलेच्या पर्सची चोरी
नाशिक : बोरगड परिसरातील सुरेखा रसाळ (४३) या महिलेची पर्स चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़३०) सकाळच्या सुमारास पंचवटीतील आरोग्य भवनजवळ घडली़ या पर्समध्ये साडेतीन हजार रुपये रोख, पॅनकार्ड, आधारकार्ड, बँकेचे पासबुक, एटीएम व मोबाइल फोन होता़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

सिडकोत तरुणाची आत्महत्या
नाशिक : लेखानगर परिसरातील इंदिरा गांधी वसाहतीतील २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ भारत दिलीप दांडेकर असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तरुणाचा मोबाइल लांबविला
नाशिक : तपोवन रोडवरील रहिवासी गणेश मिसाळ या युवकाचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरट्यांनी सारडा सर्कल परिसरातून शनिवारी (दि़२९) सकाळच्या सुमारास लांबविला़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Woman's cash lapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.