महिला बालकल्याण निधीवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:05 AM2017-09-27T00:05:57+5:302017-09-27T00:37:03+5:30
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीसाठी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात तरतूद करण्यात आलेल्या १३ कोटी २४ लाख रुपयांच्या निधीवर बांधकामसह अन्य विभागांनी डल्ला मारला असून, तब्बल १२ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी समितीची परवानगी न घेता पळविला आहे. समितीच्या लक्षात सदर प्रकार आल्यानंतर आक्रमक झालेल्या समिती सदस्यांनी सोमवारी (दि.२५) आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे गाºहाणे मांडले. दरम्यान, आपल्या अधिकाºयांच्या पराक्रमाने चकित झालेल्या आयुक्तांनी येत्या गुरुवारी (दि.२८) सर्व खातेप्रमुखांची बैठक बोलाविली आहे.
नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीसाठी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात तरतूद करण्यात आलेल्या १३ कोटी २४ लाख रुपयांच्या निधीवर बांधकामसह अन्य विभागांनी डल्ला मारला असून, तब्बल १२ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी समितीची परवानगी न घेता पळविला आहे. समितीच्या लक्षात सदर प्रकार आल्यानंतर आक्रमक झालेल्या समिती सदस्यांनी सोमवारी (दि.२५) आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे गाºहाणे मांडले. दरम्यान, आपल्या अधिकाºयांच्या पराक्रमाने चकित झालेल्या आयुक्तांनी येत्या गुरुवारी (दि.२८) सर्व खातेप्रमुखांची बैठक बोलाविली आहे. महापालिकेच्या महिला बालकल्याण विभागासाठी शासकीय धोरणानुसार ५ टक्के निधी राखीव ठेवला जातो. त्यानुसार, सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात २५ टक्के महसुली खर्चासाठी ४ कोटी ४१ लाख रुपये तर ७५ टक्के भांडवली खर्चासाठी १३ कोटी २४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. महिला व बालकल्याण समिती गठित झाल्यानंतर सभापती सरोज अहिरे यांनी सदर निधीच्या अनुषंगाने विविध उपक्रमांचे नियोजन करायला सुरुवात केली आणि त्यानुसार, कामांच्या नस्ती पाठविण्यास सुरुवात केली असता निधीची तरतूद नसल्याचे सांगत त्या परत यायल्या लागल्या. त्यामुळे, सभापतींसह समिती सदस्यांनी खोलात जाऊन त्याची चौकशी केली असता, धक्कादायक वास्तव समोर आले. महिला व बालकल्याण विभागाच्या निधीवर विविध विभागांनी डल्ला मारल्याचे लक्षात आले. त्यात बांधकाम विभागाचा सर्वाधिक वाटा आहे. विभागासाठी तरतूद केलेल्या निधीतील १२ कोटी ७३ लाख ५९ हजारांचा निधी महिला व बालकल्याण समितीची परवानगी न घेता परस्पर वळविण्यात आलेला आहे.
सद्यस्थितीत केवळ ५० लाख ८१ हजार रुपये निधी शिल्लक ठेवण्यात आला आहे. खातेप्रमुखांकडून झालेल्या या निधीचोरीबद्दल समिती सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि थेट आयुक्तांचे दालन गाठले. आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे याप्रकरणी सरोज अहिरे, सत्यभामा गाडेकर यांनी तक्रार केली आणि वजावट केलेला निधी पुनर्संचयित करण्याची मागणी केली. यावेळी खातेप्रमुखांनी दाखविलेल्या पराक्रमाबद्दल चक्रावलेल्या आयुक्तांनी येत्या गुरुवारी सर्व खातेप्रमुखांची बैठक बोलाविली असून, कोणी किती निधी घेतला याबाबतची माहिती घेतली जाणार आहे.
समितीचे नियोजन उपक्रम
समितीने काही उपक्रम नियोजित केले आहे. त्यात महिलांकरिता स्वयंरोजगार प्रशिक्षण, वाहनचालक प्रशिक्षण, ज्युदो कराटे प्रशिक्षण, समुपदेशन केंद्र सुरू करणे, वंचित बालकांचा मेळावा, सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम, बचतगटामार्फत विविध व्यवसाय सुरू करणे, प्रायोगिक तत्त्वावर महिलांकरिता सॅनिटरी नॅपकीन वेडिंग मशीन मुख्य कार्यालयात बसविणे, महिला दिन साजरा करणे आदी उपक्रमांचा समावेश आहे. निधी पळविल्याने शिल्लक ५० लाखांच्या निधीत एवढे सारे उपक्रम कसे राबवायचे, हा प्रश्न आता समितीला पडला आहे.
निधी पळविण्याची परंपरा
महिला व बालकल्याण समितीचा निधी प्रामुख्याने, बांधकाम विभागाकडून वेगवेगळ्या उपक्रमांच्या नावाखाली पळविण्यात आलेला आहे. समितीच्या सभापती सरोज अहिरे यांनी याबाबत शहर अभियंता उत्तम पवार यांना जाब विचारला असता त्यांनी निर्विकार चेहºयाने निधी वापरण्याची ही परंपरा पूर्वीपासून असल्याचे उत्तर दिले. मागील पानावरून पुढे चालू राहणारी ही परंपरा खंडित करण्यासाठी आता महिला व बालकल्याण समितीने एल्गार पुकारला असून, निधी परत मिळविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.