महिलेची फरशीवरच प्रसूती; डॉक्टरचा हलगर्जीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:40 AM2018-07-14T00:40:36+5:302018-07-14T00:41:00+5:30
नाशिक : महापालिका क्षेत्रातील गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयाची वाट दाखविणाऱ्या महापालिका रुग्णालयाचा आणखी एक हलगर्जीपणा समोर आला आहे़ प्रसूतीसाठी कथडा येथील डॉ़ झाकीर हुसेन रुग्णालयात गेलेल्या महिलेला डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयाबाहेरील फरशीवरच प्रसूत व्हावे लागले़ तसेच नुकत्याच जन्म झालेल्या बाळाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, याबाबत महिलेच्या पतीने महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाºयांकडे तक्रार केली आहे़

इंदिरानगर येथील रिजवान रफिक शहा यांनी आरोग्य अधिकाºयांकडे केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पत्नीला १० जुलै रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास प्रसूतीसाठी दाखल केले़ मात्र, यावेळी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपस्थित नव्हते, तसेच पत्नीला प्रचंड वेदना होत असतानाही तिथे असलेल्या नर्सने प्रसूतीसाठी वेळ असल्याचे सांगून बेडवर झोपवून ठेवले़ यावेळी त्यांच्या पत्नीला प्रसूतीकळा तसेच ब्लडिंग सुरू झाल्याचे नर्सला सांगूनही तिने डॉक्टरांना बोलविले नाही़ तसेच प्रसूतीसाठी वेळ आहे असे सांगत डॉक्टर सकाळी येतील असे सांगून झोपण्यासाठी निघून गेली़
दरम्यान, रिजवान शहा यांच्या पत्नीला तीव्र वेदना झाल्याने त्या हॉस्पिटलच्या खाली उतरल्या व तिथे असलेल्या फरशीवरच पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास प्रसूत झाल्या़ मात्र, तरीही तेथील नर्सने शहा यांची पत्नी व नवजात बाळाची कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नाही तसेच डॉक्टरांनाही कळविले नाही़ दरम्यान, दुसºया दिवशी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास या बाळाचा मृत्यू झाला़ निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व आरोग्य उपसंचालकांकडे पाठविण्यात आल्या आहेत़
कारवाईची मागणी
झाकीर हुसेन रुग्णालयामधील नर्स व कर्मचाºयांच्या चुकीमुळे पत्नीला प्रसूतीसाठी आणलेले असताना कोणत्याही प्रकारे दखल न घेता तसेच नर्सने डॉक्टरांनाही कळविले नाही तसेच प्रसूतीनंतर बाळाचा मृत्यू झाला़ त्यामुळे संबंधित नर्स, हॉस्पिटलच्या कारभाराची संपूर्ण चौकशी करून दोषी नर्स व कर्मचाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी रिजवान शहा यांनी केली आहे़