रस्त्यावर सोन्याचे तीन बिस्किटे पडले आहे असे सांगून महिलेचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 05:00 PM2017-09-28T17:00:12+5:302017-09-28T17:12:51+5:30

‘आमच्यासोबत चला, पुढील रस्त्यावर सोन्याचे तीन बिस्किेट पडली आहेत..’ असे सांगून एका महिलेची दिशाभूल करीत संशयितांनी तिच्या हातात बनावट पिवळ्या रंगाचे बिस्किट देऊन अस्सल दागिने काढून पोबारा

The woman's jewelry lamps are said to have fallen on the streets, saying that three gold biscuits have fallen | रस्त्यावर सोन्याचे तीन बिस्किटे पडले आहे असे सांगून महिलेचे दागिने लंपास

रस्त्यावर सोन्याचे तीन बिस्किटे पडले आहे असे सांगून महिलेचे दागिने लंपास

Next
ठळक मुद्देनाशिकरोड बसस्थानकाच्या दिशेने पायी जात होत्यातीन संशियत त्यांच्याजवळ आले व त्यांनी रस्त्यात सोन्याची बिस्किटे पडल्याचे सांगितले बोलण्यात गुंतवून ठेवत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने काढून घेतले.

नाशिक :  ‘आमच्यासोबत चला, पुढील रस्त्यावर सोन्याचे तीन बिस्किेट पडली आहेत..’ असे सांगून एका महिलेची दिशाभूल करीत संशयितांनी तिच्या हातात बनावट पिवळ्या रंगाचे बिस्किट देऊन अस्सल दागिने काढून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लिलाबाई संतु तुंगार (रा. शिवाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड बसस्थानकाच्या दिशेने पायी जात होत्या. त्यावेळी तीन संशियत त्यांच्याजवळ आले व त्यांनी रस्त्यात सोन्याची बिस्किटे पडल्याचे सांगितले. त्यानंतर तिघांनीही तुंगार यांना निर्जन परिसरात नेऊन तेथे रस्त्यावर बिस्किट पडल्याचे दाखवले. दरम्यान, तीघांपैकी दोघांनी तुंगार यांना बोलण्यात गुंतवून ठेवत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने काढून घेतले. तसेच तुंगार यांना पिवळ्या रंगाचे बिस्किटे दिले. हे बिस्किटे बनावट असल्याचे समजताच तुंगार यांनी संशियतांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संशियत पसार झाले होते. अखेर त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तीघांविरोधात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे.

 

Web Title: The woman's jewelry lamps are said to have fallen on the streets, saying that three gold biscuits have fallen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.