देशात महिला सुरक्षित नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:26 AM2018-10-20T00:26:22+5:302018-10-20T00:26:50+5:30
देशात महिला अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी व्हायला तयार नाहीत. देशात आज कोणत्याच वयोगटातील महिला सुरक्षित नाहीत अगदी तीन ...
देशात महिला अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी व्हायला तयार नाहीत. देशात आज कोणत्याच वयोगटातील महिला सुरक्षित नाहीत अगदी तीन वर्षांच्या चिमुकलीपासून ते सत्तर वर्षांच्या वयोवृद्ध महिलेवरदेखील बलात्कार होतात. गेल्या काही वर्षातील घटना पाहून मन सुन्न होते. बलात्कार विरोधी कायदा कडक करण्याच्या घोषणा झाल्या तेव्हा परिस्थितीत बदल होईल असे वाटले होते, पण काही दिवसांनी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न लहान मुलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहून पॉक्सो कायदा कडक करण्यात आला. १२ वर्षांखालील मुलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली, तरी या घटना घडतच आहे . महिला सुरक्षेसंदर्भात सरकारकडून पावले उचलली जात आहेत हे मान्य करूनही या घटना कमी होण्याऐवजी वाढतच का चालल्या आहेत याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. बलात्कार सारख्या माणुसकीला काळिमा फासणाºया घटना वाढत आहे, ही शरमेची बाब आहे. - शिवाजी जगताप, नाशिक