अॅम्बुलन्स चालकाला महिलांची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:53 AM2018-09-12T00:53:10+5:302018-09-12T00:53:37+5:30
अंबुलन्स मधून सिरीयस रु ग्णाला उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात नेले जात असताना चुकी नसतांना एका कारने पाठलाग करून कार मधील दोन महिलांनी अंबुलन्स चालकास मारहाण करीत डोक्यात काचेची बाटली मारून जखमी केल्याची घटना लखमापूर जवळ घडली.
सुरगाणा : येथून अंबुलन्स मधून सिरीयस रु ग्णाला उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात नेले जात असताना चुकी नसतांना एका कारने पाठलाग करून कार मधील दोन महिलांनी अंबुलन्स चालकास मारहाण करीत डोक्यात काचेची बाटली मारून जखमी केल्याची घटना लखमापूर जवळ घडली. त्यामुळे त्या दोन महिलांनी केलेली दबंगगिरी चर्चेचा विषय ठरली असून अंबुलन्स चालकाने त्या दोन महिलाविरोधात वणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत अंबुलन्स चालक दिगंबर पांडू गावित याने दिलेल्या फिर्यादीतम्हटले आहे की आज सकाळी साडेनऊच्या सुमारास रुग्णाला उपचारासाठी नेत असतांना दोन महिलांनी कारमधून बाहेर येत माझी कॉलर पकडूनखाली ओढले व मारहाण केली.
उगाच भांडण नको म्हणून मी अंबुलन्स नाशिककडे घेवून जाऊ लागलो. त्यावेळी त्या महिलांनी त्यांच्या कारनेपुन्हा पाठलाग केला.
करून हॉटेल श्रीहरी रेस्टॉरंट समोर अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र मला पेशंट नेणे आवश्यक असल्याने मी अंबुलन्स बाजूने काढून घेत नाशिककडे जात असतांना पुन्हा पाठलाग करून लखमापूर फाट्याच्या अलीकडे थेट समोर कार लावून अंबुलन्स अडवली. व मला खाली खेचून मारहाण सुरू केली. अंबुलन्स मधील सर्व त्या महिलांना आत पेशंट असून त्याला तत्काळ उपचाराची आवश्यकता असल्याचे समजावून सांगत असतांना एका मिहलेने जवळील भंगाराच्या ढिगार्यातून दोन काचेच्या बाटल्या आणून अंबुलन्सच्या दर्शनी काचेवर मारून काच फोडली. त्यामुळे मी तिकडे पाहत असतानाच पुन्हा एक काचेची बाटली आणून माङया डोक्यावर पाठीमागून मारून दुखापत केली. सोबत असलेल्यानी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिला असल्याने त्यांना हात लावला नाही. त्यानंतर त्या महिला कारमध्ये बसून दिंडोरीकडे पळून गेल्या. मला मार लागल्याने माङयावर दिंडोरी ग्रामिण रु ग्णालयात उपचार केले. त्यानंतर नाशिककडे रवाना झालो. त्या दोन्ही महिला व त्यांच्या कार बाबत वणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून त्या दोन्ही महिलाविरोधात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.