पाण्यासाठी महिलांनी ग्रामपंचायतीस ठोकले टाळे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:50 PM2019-12-02T12:50:14+5:302019-12-02T12:50:25+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील टाके हर्ष येथे नळपाणी पुरवठा योजना असतांनाही वीजेअभावी नळांना पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकून संताप व्यक्त केला.
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील टाके हर्ष येथे नळपाणी पुरवठा योजना असतांनाही वीजेअभावी नळांना पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकून संताप व्यक्त केला. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याार्यंत पावसाचे वास्तव्य होते.आता नुकताच पावसाळा संपला असला तरी ठिकठिकाणच्या लहान मोठ्या जलाशयात पाणी असते. पण टाके हर्ष ग्रामपंचायतीच्या हद्दीत वास्तविक योजना असतांना विद्युत पुरवठ्यासाठी ग्रामपंचायत पाठपुरावा करत नसल्याने गावाला पाणी पुरवठा होत नाही. यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकले. पिण्यासाठी पाणी मिळत नाही. नळपाणी पुरवठा योजना मे महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे खासगी विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. मात्र त्याही मालकाने त्या विहिरीला कंपाउंड करून घेतले आहे. त्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गावात असलेल्या एकमेव खासगी विहीरीवरील पाणी सर्व गाव वापरत असले तरी विहीरीतून असाच उपसा होत राहिला तर उन्हाळ्यात आपल्याला देखील पाणी मिळणार नाही असा कदाचित विचार करु न विहीर मालकाने गावाला पाणी बंद करण्याच्या हिशेबाने नुकतेच विहीरीभोवती तारेचे कंपाउंड करु न घेतले. आता गावापुढे पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान विहीर मालकाने कंपाउंडचे कुलूप उघडुन पाणी भरण्यास सर्वांना परवानगी दिली आहे. तसेच नुकत्याच येऊन गेलेल्या बुलबुल वादळात मेट चंद्राची, डहाळेवाडी, निरगुडपाडा व टाकेहर्ष येथील कमकुवत असलेले विद्युत खांब पडल्याने वरील गाव पाडे यांचा विद्युत पुरवठा अजुनही खंडीत झाला आहे. येत्या एकदोन दिवसात सर्व गावांचे विद्युत खांब बसविले जातील. त्यानंतर गावात विज पुरवठा पाणी सुरळीत होईल अशी माहिती गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी दिली.