महिलेस मारहाण; मुद्देमाल लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:28 AM2019-01-12T01:28:50+5:302019-01-12T01:31:07+5:30

शहरातील येवला-औरंगाबाद महामार्गावर एचडीएफसी बँकेशेजारील ओम गुरुदेव कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी घरातील वृद्ध महिलेला मारहाण करून जबरी चोरी करत मुद्देमाल लंपास केला.

The women beat up; Minimize the issue | महिलेस मारहाण; मुद्देमाल लांबविला

महिलेस मारहाण; मुद्देमाल लांबविला

Next
ठळक मुद्देयेवल्यातील घटना : महिला गंभीर जखमी

येवला : शहरातील येवला-औरंगाबाद महामार्गावर एचडीएफसी बँकेशेजारील ओम गुरुदेव कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी घरातील वृद्ध महिलेला मारहाण करून जबरी चोरी करत मुद्देमाल लंपास केला.
येवला शहरातील औरंगाबाद महामार्गावर ओम गुरु देव कॉलनी येथे रात्री निवृत्त शिक्षक शकुंतलाबाई दामोदर भावसार (६५) यांच्या राहत्या घराचा मागील दरवाजाचा कडी- कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत शकुंतलाबाई यांना जबर मारहाण केली. घरातील दोन कपाट तोडून त्यातील रोख रक्कम व सोने चोरून नेले.
वृद्ध महिला घरात एकट्याच असल्याने चोरट्यांनी त्याचा गैरफायदा घेऊन त्यांचा डाव साधला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. श्वान पथकाला पाचारण करून मागोवा घेण्याचा प्रयत्न केला; परंतु तपास लागला नाही. पुुढील तपास पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
वृद्धा रक्ताच्या थारोळ्यात
सकाळी शेजाऱ्यांना वृद्धेचा कन्हण्याचा आवाज ऐकू आला असता त्यांनी घरात जाऊन बघितले. त्यावेळी शकुंतलाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी ताबडतोब शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली व शकुंतलाबाई यांना रु ग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

Web Title: The women beat up; Minimize the issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.