महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन अडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 01:51 AM2019-03-20T01:51:58+5:302019-03-20T01:52:18+5:30

पुनंद पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून पाणीप्रश्न सोडवावा, यासाठी संतप्त महिलांनी मंगळवारी (दि. १९) तहसील कार्यालयासमोर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे वाहन अडवून आंदोलन केले. जिल्हाधिकारी निवडणूक कामाचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते.

Women blocked the driver's license | महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन अडविले

महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन अडविले

Next
ठळक मुद्देसटाण्याचा पाणीपुरवठा चार आठवड्यांपासून बंद

सटाणा : पुनंद पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून पाणीप्रश्न सोडवावा, यासाठी संतप्त महिलांनी मंगळवारी (दि. १९) तहसील कार्यालयासमोर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे वाहन अडवून आंदोलन केले. जिल्हाधिकारी निवडणूक कामाचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते.
सटाणा शहरात चार आठवड्यांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने गैरसोय होत आहे. 
पिण्याच्या पाण्यासह वापरासाठीही पाणी मिळत नसल्याने महिलांना त्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पालिका प्रशासनाने दोन दिवसांपासुन सुरू केलेले १० टँकर केवळ दोनशे लिटर पाणी एका घराला देतात. पाणीटंचाईने डोके वर काढल्याने संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी थेट तहसिल कार्यालय गाठले आणि निवडणुकीसंदर्भात आयोजित बैठकीसाठी आलेले जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे वाहन अडवून ठिय्या आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची काही महिलांनी भेट घेवुन चर्चा केली . या वेळी महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , पाणीपुरवठ्याबाबत पालिकेकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही, गिरणा नदीपात्रात सोडण्यात येणाºया चणकापूर धरणाच्या आवर्तनावर मालेगावसारख्या जास्त लोकसंख्येच्या शहरास सुरळीत पाणी पुरवठा होत आहे. मात्र, सटाणावासियांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी या संदर्भात संपुर्ण माहीती घेवून तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

इन्फो
विहीरी अधिग्रहीत करणार
तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी मांढरे यांनी प्रातांधिकारी प्रवीण महाजन , तहसीलदार जीतेंद्र इंगळे , नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली . यावेळी प्रातांधिकारी महाजन यांनी शहरातील विहीरी अधिग्रहीत करण्यात येवुन येत्या आठ दिवसांत पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
(फोटो १९ सटाणा)

Web Title: Women blocked the driver's license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.