कुंदेवाडी येथे महिला शिक्षण परिषद उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 10:45 PM2019-10-01T22:45:22+5:302019-10-01T22:45:55+5:30
निफाड : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला निफाड केंद्राची महिला शिक्षण परिषद तालुक्यातील कुंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कुंदेवाडी येथे झाली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक बिडवे होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
निफाड : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला निफाड केंद्राची महिला शिक्षण परिषद तालुक्यातील कुंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कुंदेवाडी येथे झाली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक बिडवे होत्या.
प्रारंभी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत म्हटले. या परिषदेचे प्रास्तविक कुंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक मंगल गोसावी यांनी केले. तांत्रिक सत्रात ज्येष्ठ शिक्षक आशा मोरे यांनी व्हिडीओ सादरीकरण करून उपक्रमांची माहिती दिली.
डेमोसत्रात मनीषा निफाडे ह्यांनी सर्व शिक्षकांचे गट करून गटकार्य करून घेतले. जिल्हा गुणवत्ता समृद्धी अभियानावर आधारित कल्पना गोसावी ह्यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली.
शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात स्मिता गोवर्धने यांनी सर्वांचा सहभाग घेऊन मार्गदर्शन केले. भाषा यशोगाथा या मुद्द्यावर विनता घोडके यांनी मार्गदर्शन केले आणि गणित विषयासंदर्भात सुशीला शिंदे ह्यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. शाळाबाह्य मुलांसाठी योगीता गोसावी यांनी उपक्रम सांगितले.
कार्यक्र माच्या शेवटी शुभांगी देशमुख ह्यांनी वैयक्तिक अभिप्राय नोंदी संदर्भात मार्गदर्शन करून
सर्वांचे अभिप्राय नोंदवून घेतले. सूत्रसंचालन पूनम महाजन यांनी केले.