गॅस दरवाढीने महिलांमध्ये संताप
By admin | Published: February 13, 2017 12:06 AM2017-02-13T00:06:39+5:302017-02-13T00:06:52+5:30
गॅस दरवाढीने महिलांमध्ये संताप
मालेगाव : अनुदान नाकारणाऱ्या गॅस ग्राहकांमध्ये नाराजीमालेगाव कॅम्प : स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ७० रुपयांनी वाढ झाली असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
गॅसचे दरमहा दर काही प्रमाणात कमी अधिक होत असतात. आंतरराष्ट्रीय इंधन बाजारावर पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर निश्चित होत असतात. चालू वर्षात जानेवारी महिन्यात गॅसचा दर ६२० रुपये ५० पैसे तर व्यावसायिक गॅसचा दर ११८७ एवढा होता. यात घरगुती गॅस दरामध्ये वाढ होऊन तो सरळ ६९० रुपये ५० पैसे एवढा झाला असून, जवळपास ७० रुपयांनी वाढ झाली आहे, तर व्यावसायिक दर रुपये १२८४ एवढा झाला असून, सुमारे ९५ रुपये एवढी दरवाढ झाली आहे.
यात घरगुती गॅसचे अनुदान आपल्या बॅँक खात्यात जमा होेते तर व्यावसायिक गॅसचे अनुदान मिळत नाही. एकदम घरगुती गॅसदरात ७० व व्यावसायिक गॅस ९५ रुपये एवढी वाढ झाल्याने गॅस ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे. घरगुती गॅसचे अनुदान गॅस मिळाल्यानंतर काही दिवसांनी बॅँकेत जमा होते, ते पैसे पुन्हा बॅँकेतून काढण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील महिन्यात गॅसदर ६२० रुपये असताना बॅँकेत १४३ रुपये अनुदान जमा होत होत,े तर फेब्रुवारीत दरवाढ होऊन गॅस ६९० रुपये एवढा झाल्यावर त्याचे सुमारे २०९ रुपये बॅँकेत अनुदान रूपाने जमा होणार आहे, असे गॅस वितरक सांगतात. परंतु गेल्या वर्षभरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅसचे दर वाढले नसल्याने ग्राहकांमध्ये समाधान होते.(वार्ताहर)