उमराणे येथे शिबीरात महिलांनी जाणुन घेतली कायदेविषयक माहीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 05:57 PM2019-07-08T17:57:51+5:302019-07-08T17:59:54+5:30
उमराणे : जिल्हा व तालुका विधी सेवा समिती तसेच वकील संघ मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उमराणे येथे महिला सक्षमिकरण कार्यक्र मांतर्गत कायदेविषयक शिबिर संपन्न झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश आर. एच. मोहम्मद होते.

येथील शिवाजी चौकात संपन्न झालेल्या मनोधैर्य योजना कार्यक्र मांतर्गत कायदेविषयक शिबिरासाठी उपस्थित शेकडो महिलांना त्यांचे हक्क, निर्भीडता, सहभाग व त्यावर उपाययोजना आदी कायदेविषयक माहिती विधीतज्ञांकडुन देण्यात आली.
यावेळी आर. के. बच्छाव, ए. के. देशमुख, गांधी, लांडगे, अॅड. मलिक शेख, सी. पी. देवरे, शैलेश भामरे आदिंसह जिल्हा व अप्पर सत्र न्यायालय तसेच तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या मान्यवरांसह देवळा तालुका गटविकास अधिकारी महेश पाटील, देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक खंडेराव रंजवे, जि. प. सदस्य यशवंत शिरसाठ, माजी जि. पं.सदस्य प्रशांत देवरे, पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे, बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, राजेंद्र देवरे, सरपंच लता देवरे, बाळासाहेब देवरे, दिलीप देवरे, सचिन देवरे आदिंसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.