महिला रुग्णालय पुन्हा वादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:23 AM2018-10-21T00:23:56+5:302018-10-21T00:24:13+5:30
भाभानगर येथे प्रस्तावित महिला रु ग्णालयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या प्रकाश क्षीरसागर यांनी याचिका मागे घेतली असली तरी महापालिका प्रशासन आणि स्थायी समिती सभापतींकडे हरकत घेतली आहे. त्यावर आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.
नाशिक : भाभानगर येथे प्रस्तावित महिला रु ग्णालयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या प्रकाश क्षीरसागर यांनी याचिका मागे घेतली असली तरी महापालिका प्रशासन आणि स्थायी समिती सभापतींकडे हरकत घेतली आहे. त्यावर आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.
शासनाच्या माध्यमातून शहरात शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी आमदार देवयानी फरांदे आग्रही असून, त्यांनी भाभानगर येथील कर्मचारी दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या वाहनतळाच्या जागेजवळील ९ हजार ६०० चौरस मीटरची जागा त्यांनी निवडली आहे. त्यास माजी आमदार वसंत गिते यांनी विरोध केल्याने भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर आली होती. यासंदर्भात प्रकाश क्षीरसागर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी मागे घेतली असली तरी न्यायायलयाच्या निर्देशानुसार त्यांनी महापालिका आयुक्त आणि स्थायी समिती सभापती यांच्याकडे हरकत घेतली आहे.
दादासाहेब गायकवाड सभागृहात होणाºया विविध प्रकारच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी पाहता तेथे सध्या असलेली जागा वाहनतळासाठी अपुरी आहे. त्यातच या ठिकाणी शंभर खाटांचे रुग्णालय झाल्यास वाहनतळासाठी जागा कोठून येणार? असा प्रश्न केला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, नियोजित बांधकाम हे जलसंपदा खात्याने आखलेल्या नासर्डी नदीच्या पूररेषेत परिसर येत आहे. त्यामुळे पूररेषेत काम करण्यास परवानगी दिली जाते का? असा प्रश्न क्षीरसागर यांनी केले आहे. सर्वांत महत्त्वाचा विषय हरकतीतच १ जानेवारी २०१६ ते ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत झालेल्या कार्यक्र मांची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांचा विचार करून रुग्णालय बांधण्याचा फेरविचार करावा, अशी मागणी हरकतपत्रात करण्यात आली आहे.