कामायनी एक्स्प्रेसमध्ये महिला गंभीर जखमी

By admin | Published: February 22, 2016 10:52 PM2016-02-22T22:52:26+5:302016-02-22T23:36:01+5:30

कामायनी एक्स्प्रेसमध्ये महिला गंभीर जखमी

Women injured seriously in Kamayani Express | कामायनी एक्स्प्रेसमध्ये महिला गंभीर जखमी

कामायनी एक्स्प्रेसमध्ये महिला गंभीर जखमी

Next

 तळेगावरोही : खंडवा रेल्वेस्थानकात कामायनी एक्स्प्रेसमध्ये दोन अनोळखी इसमांमध्ये झालेल्या हाणामारी कल्याणच्या महिला प्रवाशाला चांगलीच महागात पडली. सदर महिला यात गंभीर जखमी झाली. तिच्यावर भुसावळ येथील उपचार करण्यात आले.
मध्य प्रदेशातील खंडवा रेल्वेस्थानकात रविवारी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास कामायनी एक्स्प्रेसमध्ये (क्र. ११०७२) पोहचली. दरम्यान स्थानकावर चार-पाच तरुणांमध्ये हाणामारी सुरू होती. एक अनोळखी इसम बचावासाठी कामायनी एक्स्प्रेसमध्ये चढला. मात्र रेल्वेच्या पटरीत नशेत उभ्या
असलेल्या तरुणाने रेल्वेत चढलेल्या तरुणाला दगड मारून फेकला.
सदर दगड प्रवाशी मनीषा विनोद सिंग (३८) रा. कल्याण यांना लागून डोक्यास गंभीर जखम झाली. घटना घडल्यानंतर महिलेस तेथेच औषधोपचार मिळाले नाहीत. दुपारी ३.१० च्या दरम्यान गाडी भुसावळ येथे आल्यानंतर रेल्वे सुरक्षा
रक्षकांनी भुसावळ रेल्वेचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून सदर महिलेवर औषधोपचार केले. (वार्ताहर)

Web Title: Women injured seriously in Kamayani Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.