पाण्यासाठी महिलांचा पंचायत समितीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:50 PM2020-03-20T12:50:14+5:302020-03-20T12:51:15+5:30
खर्डे : देवळा तालुक्यातील अतिदुर्गम वार्शी गावाला धरण उशाशी असतांना देखील हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने संतप्त आदिवासी महिलांनी सरपंच बळीराम वाघ यांच्या नेतृत्वाखाली देवळा पंचायत समतिीवर मोर्चा काढला.
खर्डे : देवळा तालुक्यातील अतिदुर्गम वार्शी गावाला धरण उशाशी असतांना देखील हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने संतप्त आदिवासी महिलांनी सरपंच बळीराम वाघ यांच्या नेतृत्वाखाली देवळा पंचायत समतिीवर मोर्चा काढला. यावेळी गटविकास अधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन देण्यात आल. तालुक्यातील पश्चिम भागातील अतिदुर्गम अशा वार्शी गावातील पाणी पुरवठा योजना विस्कळीत झाल्याने गावाला पाणी पुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी येथील नागरिकांना वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे . धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी अवस्था वार्शी गावातील नागरिकांची झाल्याने सरपंच बळीराम वाघ यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी महिलांनी देवळा पंचायत समितीवर मोर्चा काढला . वार्शी व हनुमंतपाडा ग्रुप ग्रामपंचायत असून , हनुमंतपाड्याला बोअरवेल्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे . गेल्या काही वर्षभरापूर्वी वार्शी गावात राष्ट्रीय पेयजल योजनेंतुन स्वतंत्र पाणी पुरवठा योजना करण्यात आली आहे .मात्र ही योजना अद्याप ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली नाही . गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर असतांना देखील गावाला सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने नगरिकांमध्ये या योजने विषयी संभ्रम निर्माण झाला आहे . या गंभीर समस्याकडे अधिकारी व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला . याची दखल घेऊन गावाला सुरळीत पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा , अशी मागणी गटविकास अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ,याप्रसंगी जाईबाई पवार , प्रतिभा पवार ,संगीता पवार ,बिबाबाई पवार ,अरु णा पवार ,गोतमाबाई पवार ,सुमन पवार , सविता वाघ ,मनीषा मोरे ,काळूबाई माळी ,सुमनबाई वाघ , बायजाबाई माळी ,मंदा मोरे , सरु बाई पवार ,मंगल वाघ ,वर्षा वाघ आदिंसह महिला उपस्थित होत्या .