महिलांनी स्वावलंबी होऊन स्वरक्षणाचे धडे घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:15 AM2021-03-10T04:15:23+5:302021-03-10T04:15:23+5:30

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील नामपूर येथील हिरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तालुका विधी सेवा समिती व सटाणा ...

Women need to become self-reliant and learn self-defense lessons | महिलांनी स्वावलंबी होऊन स्वरक्षणाचे धडे घेणे गरजेचे

महिलांनी स्वावलंबी होऊन स्वरक्षणाचे धडे घेणे गरजेचे

Next

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील नामपूर येथील हिरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तालुका विधी सेवा समिती व सटाणा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बाेलत होते. अध्यक्ष डॉ. वीणा नारे यांनी समाजात वावरताना स्त्रियांना येणाऱ्या अडचणी व आव्हाने यावर कशाप्रकारे मात करता येईल हे सांगून स्त्रियांनी समाजात निर्भयपणे वावरावे, असे आवाहन केले. ॲड. प्रवीण बागुल यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ व अत्याचार याविषयी मार्गदर्शन केले.

ॲड. रेखा शिंदे यांनी राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांसारख्या महिलांची उदाहरणे देऊन प्रत्येक स्त्रीने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.

नामपूर महाविद्यालयाचे शैक्षणिक समन्वयक डॉ. एम. डी. अहिरे यांनी समाजातील पुरुषांप्रमाणेच महिलांना समान वागणूक व समान संधी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन प्रा. एम. आर. क्षीरसागर यांनी तर प्रा.आर पी. ठाकरे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.

===Photopath===

080321\435708nsk_72_08032021_13.jpg

===Caption===

सटाणा येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना न्या. विक्रम आव्हाड. समवेत डॉ. वीणा नारे, ॲड प्रवीण बागूल, डॉ. एम. डी. अहिरे आदी.

Web Title: Women need to become self-reliant and learn self-defense lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.