महिलांमध्ये आत्मविश्वास, कणखरपणा हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:15 AM2021-03-10T04:15:34+5:302021-03-10T04:15:34+5:30
सिन्नर महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख व्याख्यात्या म्हणून बोलत होत्या. आपली अस्मिता टिकवायची ...
सिन्नर महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख व्याख्यात्या म्हणून बोलत होत्या. आपली अस्मिता टिकवायची असेल तर नवे विचार अविष्कृत करून स्वबळावर उभे राहा. उंच भरारी घेण्याचे काम महिलांच्या संवेदनेमध्ये आहे. ते ओतप्रोत भरलेले आहे. सहनशील आणि तिची पुढच्या कामाची पावती तिच्या उत्साहात असते. वैचारिक चर्चा कुटुंबासोबत करणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. रसाळ, डॉ. डी. एम. जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. योगेश भारस्कर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. कविता नवले यांनी करून दिला. प्रा. जयश्री शिंदे यांनी आभार मानले. जयश्री बागूल यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपप्राचार्य आर. व्ही. पवार, प्रा. सुनील कर्डक, दत्तात्रेय फलके, बी. यु पवार, डॉ. स्मिता शिंदे, डॉ. अतुल गावंडे, विशाल गुळे उपस्थित होते.
फोटो - ०९ सिन्नर कॉलेज
सिन्नर महाविद्यालयात महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना विधिज्ञ शिवानी बोऱ्हाडे- जेऊघाले. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.
===Photopath===
090321\09nsk_38_09032021_13.jpg
===Caption===
फोटो - ०९ सिन्नर कॉलेज सिन्नर महाविद्यालयात महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना विधीज्ज्ञ शिवानी बोऱ्हाडे- जेऊघाले. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.