महिला बचत गटांना पंचायत समिती पेठचे गाळे मिळावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:10 AM2021-03-30T04:10:30+5:302021-03-30T04:10:30+5:30

पेठ तालुक्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तू व खाद्यपदार्थांचे उत्पादन करण्यात येत आहे. यामध्ये बांबूपासून शोभेच्या वस्तू, ...

Women self help groups should get Panchayat Samiti seats | महिला बचत गटांना पंचायत समिती पेठचे गाळे मिळावेत

महिला बचत गटांना पंचायत समिती पेठचे गाळे मिळावेत

googlenewsNext

पेठ तालुक्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तू व खाद्यपदार्थांचे उत्पादन करण्यात येत आहे. यामध्ये बांबूपासून शोभेच्या वस्तू, बांबूचे लोणचे, करवंद लोणचे, आंबा लोणचे, मशरूम, निरगुडी तेल, तरवटा चहा, हातसडीचा तांदूळ, नागली पीठ, भुजा, चटणी अशी विविध उत्पादने केली जात असून, उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी पेठ पंचायत समिती आवारात असलेले गाळे महिला बचतगटांना मिळावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

याप्रसंगी सुनंदा भुसारे, रेणुका बोसारे, भारती चव्हाण, सुगंधा वातास, सुनीता कावेर यांचे सह महिला बचत गटाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.

फोटो - २९ पेठ १

विधानसभा हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निवेदन देताना, सुनंदा भूसारे, रेणुका बोसारे, भारती चव्हाण, सुगंधा वातास, सुनीता कावेर आदी.

===Photopath===

290321\29nsk_7_29032021_13.jpg

===Caption===

विधानसभा हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निवेदन देतांना सुनंदा भूसारे, रेणूका बोसारे, भारती चव्हाण, सुगंधा वातास, सुनिता कावेर आदी.

Web Title: Women self help groups should get Panchayat Samiti seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.