महिलांनी पोलिसांकडे समस्या मांडाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 05:20 PM2018-11-30T17:20:37+5:302018-11-30T17:21:42+5:30

संजय दराडे :तोरंगण येथे महिलांसंदर्भात कायदे ,सायबर क्र ाईम कार्यशाळा वेळुंजे(त्र्यं): महिलांनी पोलिसांकडे अडीअडचणी, समस्या तसेच तक्र ार असेल तर प्रत्यक्ष ठाण्यात जाऊन रीतसर तक्र ार नोंदवावी.व पोलिसही सहकार्य करतील असा विश्वास देत महिलांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा असे प्रतिपादन नाशिक जिल्हा पोलीस (ग्रामीण) अधीक्षक संजय दराडे यांनी केले.

 Women should issue a problem to the police | महिलांनी पोलिसांकडे समस्या मांडाव्यात

  तोरंगण येथे महिला कायदेविषयक कार्यशाळेत उपस्थित मान्यवर  

Next
ठळक मुद्देहरसूल येथे सॅनिटरी नॅपिकन वेंडिंग मशीनचे उदघाटन पोलीस अधिक्षक (ग्रामीण) संजय दराडे तसेच रोहिणी दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. तोरंगण येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात एकदिवसीय महिलांविषयी कायदे आणि सायबर क्र ाईम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्


संजय दराडे :तोरंगण येथे महिलांसंदर्भात कायदे ,सायबर क्र ाईम कार्यशाळा
वेळुंजे(त्र्यं): महिलांनी पोलिसांकडे अडीअडचणी, समस्या तसेच तक्र ार असेल तर प्रत्यक्ष ठाण्यात जाऊन रीतसर तक्र ार नोंदवावी.व पोलिसही सहकार्य करतील असा विश्वास देत महिलांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा असे प्रतिपादन नाशिक जिल्हा पोलीस (ग्रामीण) अधीक्षक संजय दराडे यांनी केले.
तोरंगण (ता.त्र्यंबकेश्वर) येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील निर्मल गंगा गोदा बहुउद्देशीय संस्थेतर्फे महिलाविषयी कायदे व सायबर क्र ाईम याविषयी एकदिवसीय कार्यशाळेच्या कार्यक्र मप्रसंगी ते अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
हरसूल येथे सॅनिटरी नॅपिकन वेंडिंग मशीनचे उदघाटन पोलीस अधिक्षक (ग्रामीण) संजय दराडे तसेच रोहिणी दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. तोरंगण येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात एकदिवसीय महिलांविषयी कायदे आणि सायबर क्र ाईम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उदघाटन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात येऊन संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांची प्रतिमापूजन तसेच दीपप्रज्वलाने कार्यक्र माची सुरु वात करण्यात आली. विद्यार्थिनी यावेळी स्वागत गीत सादर केले.
व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा शीतल गायकवाड,सौ.रोहिणी दराडे, सौ.माने,नितीन सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते मिथुन राऊत,सरपंच कमल बोरसे,हरसुलचे एपीआय प्रवीण साळुंखे,राहुल बोरसे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, इतरांकडून महिलांना मानिसक अथवा शारिरीक त्रास होत असेल त्या महिलांनी खचून न जाता नाशिक येथे तक्र ार नोंदवावी.यासाठी तुम्हाला पोलिसही सहकार्य करतील.तसेच पोलिसाविषयी असलेली दृढ भावना बाजूला सारून थेट पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवावी.व पोलिसांवरील विश्वास दृढ करण्यासाठी महिलांनी पुढे यावे असे प्रतिपादन केले.
यावेळी सौ.रोहिणी दराडे महिला सबलीकरण आण िसक्षमीकरणावर,संस्थेच्या अध्यक्षा सौ. शीतल गायकवाड यांनी महिलांचे आरोग्य तसेच गोदावरी इंटरप्रायजेसचे चेअरमन नितीन सोनवणे यांनी महिला बचत गट रोजगाराच्या संधी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी आर्या इंडस्ट्रीचे प्रशांत बच्छाव, सुजाता बच्छाव यांनी संस्थेस सॅनिटरी नॅपिकन वेंडिंग मशीन भेट देत उपस्थित होते. यावेळी कार्यशाळेत महिला बचत गट,अंगणवाडी सेविका,मदतनीस,शिक्षिका,गृहिणी,महाविद्यालियन विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.आभार राहुल बोरसे यांनी मानले.
 

Web Title:  Women should issue a problem to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.