महिला - सुलोचना रोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:15 AM2021-03-08T04:15:06+5:302021-03-08T04:15:06+5:30
पतीबरोबर नाशिकला बांधकामाच्या अनेक साईटवर काम केले. साईट सुरू असताना तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये संसार थाटले. एक साईट संपली की ...
पतीबरोबर नाशिकला बांधकामाच्या अनेक साईटवर काम केले. साईट सुरू असताना तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये संसार थाटले. एक साईट संपली की दुसरीकडे. मात्र, मुलांना शाळेत घातले. साईटवर काम मिळाले नाही तर मुलांच्या शिक्षणासाठी काहीकाळ धुण्या-भांड्याची कामे केली. एक मुलगा धावण्यात तरबेज म्हणून त्याला स्पर्धांसाठी प्रोत्साहन दिले; तर दुसरा मुलगा बालपणापासून हुशार असल्याने दहावीला बोर्डात आला. तो रात्री अभ्यास करतो. त्याला झोप लागू नये म्हणून त्याच्याबरोबर रात्री उशिरापर्यंत घरगुती कामे करीत जागून काढल्या. त्यातील पहिला मुलगा उमेश रोटे हा पालघरला पोलीस अधिकारी; तर दुसरा मुलगा प्रा. नीलेश रोटे हा धुळ्याला विद्यावर्धिनी महाविद्यालयात वाणिज्य विभागप्रमुख आहे.
- सुलोचना अंबादास रोटे
(०७सुलोचना रोटे)