महिलांना हवे ब्लू लाइन रिक्षा परवाने

By admin | Published: November 21, 2015 11:43 PM2015-11-21T23:43:56+5:302015-11-21T23:44:24+5:30

महिलांना हवे ब्लू लाइन रिक्षा परवाने

Women want blue line rickshaw licenses | महिलांना हवे ब्लू लाइन रिक्षा परवाने

महिलांना हवे ब्लू लाइन रिक्षा परवाने

Next

नाशिक : स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत शासनाने महिलांना विशेष प्रशिक्षण देऊन ब्लू लाइन रिक्षा चालविण्यासाठी परवाने द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा- टॅक्सीचालक सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनीच ही मागणी केली असून, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्र दिले आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय शासन आणि महापालिकेच्या वतीने व्यक्त होत आहे. त्या अंतर्गतच शहरात ब्लू लाइन रिक्षा सुरू कराव्यात, त्या चालविण्याचे परवाने केवळ महिलांनाच द्यावेत, त्यासाठी शासनाने महिलांना प्रशिक्षण द्यावेत, प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना शासनाच्या इतर महामंडळांप्रमाणेच रिक्षा खरेदी करण्यासाठी वित्त सहाय्य उपलब्ध करून द्यावे, तसेच सदर महिलांची रिक्षासेवा आॅनलाइन उपलब्ध करून द्यावी, त्यासाठी त्यांना कॉल सेंटरचेही प्रशिक्षण द्यावे, जयपूरप्रमाणे नाशिक शहरात हा प्रयोग केल्यास तो यशस्वी होईल, असे नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Women want blue line rickshaw licenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.