महिलांची चूल आणि फुंकणीतून होणार मुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:19 AM2021-08-18T04:19:13+5:302021-08-18T04:19:13+5:30
बायोगॅस सयंत्रामुळे संबंधित लाभार्थी यांची इंधन बचत होऊन आर्थिक बचत होईल, नैसर्गिक समतोल साधला जाईल, बायोगॅस स्वयंपाकासाठी वापरल्याने ग्रामीण ...
बायोगॅस सयंत्रामुळे संबंधित लाभार्थी यांची इंधन बचत होऊन आर्थिक बचत होईल, नैसर्गिक समतोल साधला जाईल, बायोगॅस स्वयंपाकासाठी वापरल्याने ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारेल. गुजरखेडे येथे आठ संयंत्राचे आरसीसी बांधकाम सुरू करण्यात आले असून, प्रत्येक लाभार्थीला १७ हजार रुपये अनुदान व बायोगॅस सयंत्रांला शौचालय जोडल्यास सोळाशे रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या विकास योजनेचा शुभारंभ शिवसेना नेते संभाजी पवार व पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या सहकार्याने व सरपंच बापूसाहेब चव्हाण यांच्या माध्यमातून सुरू आहे. बायोगॅस सयंत्रांचे उद्घाटन कृषी विस्तार अधिकारी उमेश सूर्यवंशी, सरपंच बापूसाहेब चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तू पवार, सखाहरी पवार, नानासाहेब चव्हाण, राधाजी सोळुंके, मारकळी सर उपस्थित होते.
फोटो - १६ जळगाव नेऊर बायोगॅस
येवला तालुक्यातील गुजरखेडे येथे राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेचा शुभारंभ करताना कृषी विस्तार अधिकारी उमेश सूर्यवंशी, सरपंच बापूसाहेब चव्हाण व सदस्य.
160821\140416nsk_48_16082021_13.jpg
येवला तालुक्यातील गुजरखेडे येथे राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेचा शुभारंभ करतांना कृषी विस्तार अधिकारी उमेश सूर्यवंशी, सरपंच बापूसाहेब चव्हाण व सदस्य.