जऊळके येथे महिला शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 09:30 PM2020-07-15T21:30:01+5:302020-07-16T00:16:54+5:30
जळगाव नेऊर : येथे महिलांची शेतीशाळा संपन्न झाली. कृषी पर्यवेक्षक भास्कर नाईकवाडे, कृषी सहाय्यक एस.एम. तांबे यांनी महिलांना मार्गदर्शन करत कृषिदिनाचे महत्त्व सांगितले. तसेच महिलांना त्यांचा शेतीतील सहभाग, पिकावरील शत्रू, मित्रकीटक यांची माहिती सांगून ओळख करून दिली.

कृषी सहाय्यक तांबे यांनी महिलांकडून दशपर्णी अर्क प्रात्यक्षिक तयार करून घेऊन त्याचे फायदे व उपयोग सांगितले. याप्रसंगी शिवाजी पवार, जयश्री मोरे, गीता क्षीरसागर, अनिता पवार यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
दरम्यान, कृषी विभागाच्या वतीने मका पिकावरील लष्करी अळीची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करून लष्करी अळी, सोयाबीन कीडरोग याबाबतचे पत्रकवाटप करण्यात आले.