ग्रामीण पोलीस मुख्यालयातर्फे स्त्रियांची कर्करोग तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 11:06 PM2018-12-05T23:06:47+5:302018-12-05T23:07:08+5:30
नाशिक : नोकरी व कुटुंब अशी दुहेरी जबाबदारी पार पाडणाऱ्या महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते़ कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी पार पाडणा-या महिलेचे आरोग्य बिघडले की सर्वच कुटुंबाचे आरोग्य बिघडते, त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याप्रती जागरूक रहावे, असे प्रतिपादन ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले़
नाशिक : नोकरी व कुटुंब अशी दुहेरी जबाबदारी पार पाडणाऱ्या महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते़ कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी पार पाडणा-या महिलेचे आरोग्य बिघडले की सर्वच कुटुंबाचे आरोग्य बिघडते, त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याप्रती जागरूक रहावे, असे प्रतिपादन ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले़ ‘जागर स्त्री आरोग्याचा’ या उपक्रमांतर्गत आडगाव पोलीस मुख्यालयातील बहुद्देशीय हॉलमध्ये ग्रामीण पोलीस व रोटरी क्लब आॅफ नाशिक नॉर्थ यांचे संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित मोफत मेमोग्राफी टेस्ट (स्तन कर्करोग तपासणी) व पॅप स्मिअर टेस्ट (गर्भाशय कर्करोग तपासणी) शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक संजय दराडे, त्यांच्या पत्नी रोहिणी दराडे, रोटरी क्लब आॅफ नाशिक नॉर्थचे प्रेसिडंट मीना ओबेरॉय, सचिव निखिल खोत, डॉ. नितीन लाड यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये महिलांची प्राथमिक तपासणी करून आवश्यक त्या महिलांची मेमोग्राफी व पॅप स्मिअर तपासणी करण्यात आली. दिवसभरात सुमारे २०० हून अधिक महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. रोटरी क्लब आॅफ नाशिक नॉर्थ व अमरावती मिडटाउन मेमोग्राफी पथकातील डॉ. नितीन लाड स्त्रीरोग तज्ज्ञ नवजीवन हॉस्पिटल व संस्थेच्या सदस्य यांच्या मार्फत उपस्थित महिलांची तपासणी करण्यात आली.
यावेळी महिलांना स्तन कर्करोग व गर्भाशयाचे कर्करोगाबाबतची लक्षणे, प्राथमिकदृष्ट्या घ्यावयाच्या काळजीबाबत उपस्थित डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. तसेच महिलांवरील कामाच्या तणावामुळे निर्माण होणाºया समस्या, रोग-व्याधी, अशक्तपणा, वंध्यत्व उपचार, गर्भसंस्कार, तसेच महिलांच्या इतर आजारांवर मार्गदर्शन व औषधोपचारांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक सुरेश जाधव, मानव संसाधन विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी महिला सहायक पोलीस निरीक्षक तृणा गोपनारायण, महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा महाजन, पूनम राऊत, तसेच जिल्ह्यातील पोलीस ठाणेनिहाय महिला पोलीस अधिकारी व महिला कर्मचारी, पोलीस कुटूंबातील महिला तसेच पोलीस सखी मंचाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.