मालेगाव शहर परिसरात महिला दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:17 AM2021-03-09T04:17:05+5:302021-03-09T04:17:05+5:30
केबीएच विद्यालय, शेरुळ मालेगाव : तालुक्यातील शेरुळ येथील के.बी.एच.विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ...
केबीएच विद्यालय, शेरुळ
मालेगाव : तालुक्यातील शेरुळ येथील के.बी.एच.विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक के. वाय. पगार हे होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात तृप्ती वाघ,मानवी खैरनार या विद्यार्थिनींचा गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. तृप्ती वाघ या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. वाय.एस.ठोके, एस.के.पवार यांची भाषणे झाली. डाॅ.आर.पी.गर्दे यांनी आभार मानले.
---------------------------------------
के.बी.एच. विद्यालय, वडेल
मालेगाव:- तालुक्यातील वडेल येथील के.बी.एच.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या शिक्षिका एस.बी.गायकवाड या होत्या. त्यांच्या व पर्यवेक्षक बी. जी. शेवाळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील मेघा पांढरे ,धनश्री शेलार या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. तर कल्याणी वाघ, गायत्री काकुळाते यांनी स्त्रीभ्रूण हत्यासंदर्भात कविता सादर केल्या. उपशिक्षका पी. के. हिरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन के.बी.अहिरे यांनी केले तर बच्छाव यांनी आभार मानले.
-----------------------------------------------
शुभदा विद्यालय, सोयगाव
मालेगाव : येथील सोयगाव भागातील शुभदा विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी कॅम्प पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक छाया पाटील होत्या. प्रास्ताविक प्राचार्य के. डी. चंदन, सूत्रसंचालन मनिषा बिरारीस यांनी केले. यावेळी दयाराम अहिरे , कैलास भामरे , हिरा घरटे ,साहेबराव व्याळीज, मनिषा शिंदे ,दीपक निकम ,किरण देवरे , ज्योत्स्ना तेवर, कीर्ती पवार, भावसिंग शेवाळ, अनिल अहिरे, प्रवीण शिरसाठ, हरिभाऊ अहिरे आदी उपस्थित होते. एस. एम. पवार यांनी आभार मानले.
-------------------------------------------
टीकेआरएच विद्यालय, निमगाव
मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथील टीकेआर एच विद्यालयात मुख्याध्यापक आर. जे. निकम यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. निमगाव प्राथमिक केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी शिंदे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. आर. जी. पाटील, शिंदे तसेच विद्यार्थिनी समृद्धी हिरे, सपना सूर्यवंशी, गायत्री कांडेकर, ऋतुजा हिरे, प्रांजली अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिला म्हणून डॉ. माधुरी शिंदे, उपशिक्षिका एच.एम.कानडे, बच्छाव यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन बी. बी. अहिरे यांनी केले. तर आर. आर. शिंदे यांनी आीार मानले. कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्याध्यापक आर. जी. पाटील, पर्यवेक्षक जी. ए. शेवाळे उपस्थित होते.
-------------------------------------
एल.व्ही. एच. विद्यालय कॅम्प
मालेगाव : येथील एल.व्ही. एच. विद्यालयात मुख्याध्यापक दिनेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिक्षिका बी. एम. आहिरे या होत्या. यावेळी पवार, एस. यु. साळुंखे, पर्यवेक्षक एम. पी. शिंदे यांनी महिलांनी विविध क्षेत्रांत केलेल्या कामाचा गौरव केला. सूत्रसंचालन के. आर सूर्यवंशी यांनी केले. तर जे. एच. सावकार यांनी आभार मानले.