भुजबळ नॉलेज सिटीत महिला शिक्षण दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 05:34 PM2021-01-05T17:34:32+5:302021-01-05T17:35:39+5:30
नाशिक : स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व पहिला महिला शिक्षण दिन भुजबळ नॉलेज सिटीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
हिच्या हस्ते भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात असलेल्या सावित्रीबाई व ज्योतीराव फुले यांच्या पुतळ्याला ११ वी सायन्सची विद्यार्थिनी श्रावणी बागुल हिच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी श्रावणीने ह्यमी सावित्री बोलतेह्ण हा एकपात्री प्रयोग सादर केला. पहिला महिला शिक्षण दिन व १९० वी सावित्रीबाई फुले जयंती चे औचित्य साधून संस्थेने ऑनलाईन योगा सत्र, निबंध स्पर्धा, पोस्टर कॉम्पिटीशन, चित्रकला स्पर्धा अशा अनेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनेक विद्यार्थांनी सहभाग नोंदविला. प्रा. सुजाता आव्हाड यांनी मनोगतात सावित्रीबाईंच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक, भुजबळ नॉलेज सिटीचे सर्व प्रमुख अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.