महिलांचा मोर्चा

By admin | Published: February 23, 2016 11:18 PM2016-02-23T23:18:34+5:302016-02-23T23:31:04+5:30

चिचोंडी खुर्द : विहिरीने तळ गाठल्याने पाण्यासाठी भटकंती

Women's Front | महिलांचा मोर्चा

महिलांचा मोर्चा

Next

 येवला : तालुक्यातील चिचोंडी खुर्द येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायतवर मोर्चा काढला.
चिचोंडी खुर्द येथील सार्वजनिक विहीर व आडाने तळ गाठल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
त्यामुळे महिलांनी आक्रमक होत
थेट ग्रामपंचायतीवर हंडामोर्चा
नेला. एक तास ठिय्या आंदोलन करत टँकर सुरू करावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. यावेळी सरपंच कल्पना जाधव, ग्रामसेवक सी. डी. बोरसे यांना निवेदन देण्यात आले.
टँकर मागणीचा ठराव पंधरा दिवसांपूर्वीच वरिष्ठांना पाठवला असून, प्रस्तावावर वरिष्ठांची सही न झाल्याने टँकर सुरू झाला नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने महिलांनी संतप्त होत आपला मोर्चा येवला तहसील कार्यालय व पंचायत समितीवर नेला. यावेळी सरपंच कल्पना जाधव, ग्रामसेवक सी. डी. बोरसे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर चंद्रभागा मढवई, सुंदरबाई सोनवणे, प्रमिला राजगुरू, सुमन मढवई, लहानूबाई मढवई, परवीन शेख, अलका मढवई, सविता राजगुरु, सुनीता राजगुरु, सुशीला कुलकर्णी, रिजवाना पठाण, संगीता जोशी, लंकाबाई गोसावी, मनीषा चव्हाण, छाया धाकतोडे, उषा राजगुरू, कुलसबी शेख, हेमवती वाडेकर, जरीना शेख, बेबी मढवई, संगीता सोनवणे, कविता मढवई, सुनीता गायकवाड, हिराबाई गोसावी, किशाबाई पवार, अरुणा पवार, फरजाना शेख, बिस्मिल्ला शेख, मंगल मढवई, रेवती कासलीवाल, शमीना शेख, रोहिणी मढवई, जया धाकतोडे, कल्पना धाकतोडे, सुमन पवार, संतोष मढवई, सुनील कासलीवाल, विठ्ठल पळे, दत्ता जाधव आदिंच्या सह्या आहेत. (वार्ताहर)
पथदीपांभोवतीच्या वृक्ष फांद्या छाटणीची मागणी
नाशिक : शहरात ठिकठिकाणी पथदीपांभोवती वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या छाटण्याची मागणी दक्षता अभियानचे संचालक आणि नगरसेवक विक्रांत मते यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, शहरात ठिकठिकाणी पथदीपांभोवताली वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या छाटण्याची मागणी वारंवार केली जात आहे, परंतु उद्यान निरीक्षकांकडून ट्री अ‍ॅक्टमधील कलमांचा आधार घेऊन वृक्ष छाटणीबाबत टाळाटाळ केली जात आहे. उद्यान निरीक्षकांकडून सदर कलमांचा अर्थ आपल्या सोयीनुसार आणि कामाची जबाबदारी टाळण्याकरिता घेतला जात
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Women's Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.