नगरपालिकेतर्फे महिलांचा गौरव
By admin | Published: March 13, 2016 11:09 PM2016-03-13T23:09:46+5:302016-03-13T23:35:18+5:30
त्र्यंबक : उत्पादन आणि बाजारपेठेबाबत महिलांना मार्गदर्शन
त्र्यंबकेश्वर : भारतीय संविधानाने सर्वांना बहाल केलेले मूलभूत हक्क आणि स्त्रियांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क याबाबत प्रश्नचिन्ह लावत पुरुषांच्या बरोबरीने आज स्त्रिया काम करीत आहेत. तरीही त्यांना अभिव्यक्त करता येत नाही, अशी खंत अॅड. इंद्राणी यांनी व्यक्त केली. त्र्यंबक नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने शनिवारी आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
बचतगटाच्या माध्यमातून आपले उत्पादन आणि बाजारपेठेचे उपलब्धता या विषयावर त्यांनी महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधत चर्चा केली. यावेळी भूमाताविरोधी व सनातन हिंदू धर्म मुंबईच्या प्रतिनिधींनीदेखील या कार्यक्रमात हजेरी लावली व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची स्त्रीभ्रूण हत्त्या व सामाजिक भविष्य या विषयावर लघुनाटिका सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी आपल्या भाषणात इतिहासातील स्त्री, आदिशक्तींचा उल्लेख करत महिलांचे समाजातील स्थान, योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.
सभापती सिंधू मधे, अनघा फडके, माधुरी जोशी, शकुंतला वाठणे, अलका शिरसाट, अंजना कडलग, तृप्ती धारणे, आशा झोंबाड, यशोदा आडसरे,उपनगराध्यक्ष संतोष कदम आदि नगरसेवक उपस्थित
होते. पालिकेत सहायक प्रकल्पााधिकारी व समूह संघटक म्हणून कार्यभार हाती घेतला. पंकज शिंपी व अनिता गुंजाळ, राज्य नागरी उपविकास अभिनवचे मधुकर साळी, मिसर आदिंनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी उप जिल्हा रुग्णालयातर्फे नेत्रतपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले. मागील मेळाव्यातदेखील कर्करोग निदान घ्यावयाची काळजी व उपचार आदिंबाबत माहिती देण्यात आली होती. (वार्ताहर)