खंडणी मागणाºया महिला वकिलाचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:31 AM2017-09-22T00:31:38+5:302017-09-22T00:32:00+5:30
‘माझ्या क्लार्इंटच्या मुलीवर योग्य उपचार तू केले नाही, तिला औषधांचा साइडइफे क्ट झाला. भरपाई म्हणून अडीच लाख रुपये दे, अन्यथा खोटे गुन्हे तुझ्याविरुद्ध दाखल करू’ अशाप्रकारे धमकावणाºया एका महिला वकिलाचा पोलिसांनी गुरुवारी (दि.२१) संध्याकाळी पर्दाफाश केला.
नाशिक : ‘माझ्या क्लार्इंटच्या मुलीवर योग्य उपचार तू केले नाही, तिला औषधांचा साइडइफे क्ट झाला. भरपाई म्हणून अडीच लाख रुपये दे, अन्यथा खोटे गुन्हे तुझ्याविरुद्ध दाखल करू’ अशाप्रकारे धमकावणाºया एका महिला वकिलाचा पोलिसांनी गुरुवारी (दि.२१) संध्याकाळी पर्दाफाश केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातपूर परिसरात राहणाºया एका महिला डॉक्टरकडे अडीच लाख रुपयांची खंडणी मागणाºया अॅड. कामिनी माणिकशा खेरुडकर या पेशाने वकील असलेल्या महिलेला पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईनाका पोलिसांनी अटक केली. खेरुडकर हिने सातत्याने महिला डॉक्टरला धमकावून अडीच लाख रुपये देण्यासाठी दबाव वाढविला होता. कोणतीही चूक नसताना रक्कम का म्हणून द्यावयाची, असा विचार सदर डॉक्टर महिलेच्या मनात आल्याने त्यांनी पाटील यांचे कार्यालय गुरुवारी दुपारी गाठून घडलेला प्रकार कथन केला. त्यानुसार पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक सारिका आहिरराव व पवार यांना तातडीने बोलावून सदर प्रकरणाबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. यानुसार पोलिसांनी कागदाचे बंडल नोटांच्या आकाराचे तयार करून ते एका पिशवीत भरून डॉक्टर महिलेला खेरुडकर हिने ज्या पत्त्यावर बोलविले तेथे नेऊन देण्यास सांगितले. प्रथम खेरुडकर हिने डॉक्टरला कॅनडा कॉर्नरवर रक्कम घेऊन येण्यास सांगितले. पोलिसांनी तेथे साध्या वेशात सापळा रचला; मात्र उपयोग झाला नाही. खेरुडकर हिने पुन्हा पत्ता बदलून महामार्ग स्थानकाजवळ मुंबई नाका येथे येण्यास सांगितले. त्यानुसार डॉक्टर महिलेचा कॉल ट्रॅप करत मुंबईनाका व सरकारवाडा पोलिसांनी महामार्ग परिसरात सापळा रचला. या ठिकाणी डॉक्टर सदर कागदाचे बंडल भरलेली पिशवी घेऊन पोहचले. त्यांनी खेरुडकर यांच्या हातामध्ये पिशवी सोपविली असता दबा धरून बसलेल्या महिला व पुरुष पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी झडप घालून खेरुडकरसह तिचे साथीदार मधुकर यशवंत नाठे, कमलेश विष्णू लांडगे, अर्जुन तुकाराम रणशूर यांना ताब्यात घेतले.