येवल्यात महिला मुक्तीदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:44 PM2020-12-25T17:44:31+5:302020-12-25T17:44:42+5:30
क्रांतीज्योती महिला सभेच्या वतीने महिला मुक्ती दिन
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : केंद्रातील सर्वसामान्य, शेतकरी, कामगार विरोधी सरकारच्या विरोधात होणार्या आंदोलनात डाव्या, पुरोगामी, समाजवादी व राष्ट्रप्रेमी पक्ष, संघटनांनी आपले क्रांतीकारी योगदान द्यावे, असे प्रतीपादन ज्येष्ठ विचारवंत रणजीत परदेशी यांनी केले.
क्रांतीज्योती महिला सभेच्या वतीने शहरातील मित्रविहार कॉलनीतील क्रांतीज्योती निवास येथे महिला मुक्ती दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका कॉ. चहाबाई अस्वले तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत रणजीत परदेशी, सामाजीक कार्यकर्त्या निर्मला कुलकर्णी उपस्थित होत्या. प्रारंभी अतिथींच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांचे प्रतीमेचे पूजन करण्यात आले.
अॅड. दिलीप कुलकर्णी यांनी शेतकरी प्रश्नांवर बोलतांना केंद्राच्या निर्णयांवर जोरदार टीका केली. भगवान चित्ते चंद्रकांत साबरे, निर्मला कुलकर्णी, चहाबाई अस्वले यांची प्रसंगोचित भाषणे झाली. सूत्रसंचलन नितीन संसारे यांनी तर आभार प्रदर्शन अरविंद संसारे यांनी केले. कार्यक्रमास आयुब शाह, प्रणव कोकणे, नंदू गायकवाड, सतिष संसारे, सय्यद कौसर, योगेंद्र वाघ, मोबीन शेख, प्रियंका संसारे, सुनीता जाधव, जुबेर सौदागर, नचिकेत जाधव, जितेश पगारे, शरद अहिरे, रशिद अख्तर, स्वप्नील सोनवणे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो- २५ येवला महिला मुक्ती
येवला येथे क्रांतीज्योती महिला सभेच्या वतीने आयोजित महिला मुक्ती दिन कार्यक्रम प्रसंगी बोलतांना भगवान चित्ते. व्यासपीठावर अॅड. दिलीप कुलकर्णी, कॉ. चहाबाई अस्वले, निर्मला कुलकर्णी, सरोज कांबळे आदी.