वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनवर महिलांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 05:53 PM2020-10-28T17:53:22+5:302020-10-28T17:54:06+5:30
वाडीवऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील फैब कंपनीच्या कामगारांनी केलेले आंदोलन पोलिसांनी चिरडुन टाकले व कामगारांवर खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप करत सीटू संघटनेच्या माध्यमातून जनवादी महिला संघटनेच्या वतीने वाडीवऱ्हे पोलिसांविरोधात मोर्चा काढला. याबाबत विविध मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांना देण्यात आले.

काही दिवसांपूर्वी फैब कंपनीच्या कामगारांनी सीटू संघटनेच्या माध्यमातून कामगारांना कायम करावे यासाठी आंदोलन केले होते. त्यासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरू होते. मात्र पोलिसांनी कामगार करत असलेल्या शांततेच्या आंदोलनाला दडपण्यासाठी मोठा फौज फाटा आणत कामगार आणि त्यांच्या परिवारातील महिलांवार लाठीचार्ज केला व त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत, असा आरोप निवेदनात केला आहे. मोर्चेकऱ्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली. यावेळी सीटू संघटनेचे सीताराम ठोंबरे, जनवादी महिला संघटनेच्या सिंधू शार्दूल, कल्पना शिंदे, विजया टिक्कल, दत्ता राक्षे, मोहन जाधव, कांतिलाल गरुड, भाऊसाहेब जाधव, मनोज भोर, विठोबा कातोरे, अशोक कदम आदींसह गोंदे, वाडीवऱ्हे औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांमधील कामगार उपस्थित होते.