कुमावत समाज सेवा संघाच्या महिलांचा मेळावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 05:44 PM2019-01-08T17:44:39+5:302019-01-08T17:45:19+5:30

पाथरे : महाराष्ट्र कुमावत समाज सेवा संघाच्यावतीने नाशिक येथील अशोकनगर भागात महिला आघाडीचा मेळावा उत्साहात पार पडला. सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक परिसरातील महिला आघाडीच्या मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते.

The Women's Meet of the Kumawat Samaj Sewa Sangh | कुमावत समाज सेवा संघाच्या महिलांचा मेळावा 

कुमावत समाज सेवा संघाच्या महिलांचा मेळावा 

googlenewsNext

पाथरे : महाराष्ट्र कुमावत समाज सेवा संघाच्यावतीने नाशिक येथील अशोकनगर भागात महिला आघाडीचा मेळावा उत्साहात पार पडला.
सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक परिसरातील महिला आघाडीच्या मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते. संघाच्या महिला प्रदेश संघटक पल्लवी प्रकाशकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महिलांच्या अनेक समस्यांवर, अडीअडचणी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावर उपाययोजना करण्यासाठी विविध पैलूंनी विचार करण्यात आला. बैठकीत विशेष मार्गदर्शन करण्यासाठी मेकअप आर्टिस्ट रक्षा पाटील उपस्थित होत्या. लवकरच आपण कुमावत समाजाच्या महिला संघासाठी मेकअप सेमिनार आयोजित करून महिलांना आर्थिक सक्षमतेसाठी मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. समाज सेवा संघाच्या बरोबर महिला सबलीकरणाच्या चळवळीला वेग देण्याचा निर्धार पल्लवी प्रकाशकर यांनी व्यक्त केला. बैठकीत महिलांनी आपले मत व्यक्त करून त्यावरील उपाययोजना यावर चर्चा केली. महिलांना यामुळे खुले व्यासपीठ मिळाले. मनमोकळे बोलायची व आपले मत मांडायचे संधी दिली उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीकांत परदेशी, पल्लवी प्रकाशकर यांचे महिलांनी समाधान व्यक्त केले. पल्लवी प्रकाशकर यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले.
यावेळी कल्पना कुमावत, योगिता कुमावत, सविता कारवाळ, रूपाली खंडेलवाल, सपना कुमावत, देविका कुमावत, श्रद्धा कुमावत, अर्चना कुमावत, वंदना पनेर, सारिका कुमावत, उर्मिला बेलदार, अश्विनी बेलदार, अनिता कुमावत, नंदा कुमावत, कल्पना कुमावत, सुनिता कुमावत, योगिता कुमावत, देवका अंबेरे, ज्योती कुमावत, निकिता कुमावत, नीता कुमावत, लीला कुमावत, विद्या कुमावत, जयश्री कुमावत, सोनया बेलदार, वैशाली बेलदार, लिला कुमावत आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची व्यवस्था सेवा संघाच्या स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली होती.

Web Title: The Women's Meet of the Kumawat Samaj Sewa Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.