पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 11:19 PM2019-12-26T23:19:10+5:302019-12-26T23:20:40+5:30
येवला शहरातील बाजीरावनगर भागात पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त झालेल्या कॉलनीवासीयांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवक प्रा. शीतल शिंदे यांनी पालिकेच्या सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले. पालिकेच्या सभागृहात मालमत्ता करवाढीसंदर्भात नगरसेवकांच्या विशेष सभेचे निमित्त साधून शिंदे यांनी दोन वर्ष प्रलंबित असणाऱ्या पाण्याच्या प्रश्नासाठी गुरुवारी (दि.२६) आंदोलन सुरू केले. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने आणि थेट काम सुरू केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
येवला : शहरातील बाजीरावनगर भागात पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त झालेल्या कॉलनीवासीयांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवक प्रा. शीतल शिंदे यांनी पालिकेच्या सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले. पालिकेच्या सभागृहात मालमत्ता करवाढीसंदर्भात नगरसेवकांच्या विशेष सभेचे निमित्त साधून शिंदे यांनी दोन वर्ष प्रलंबित असणाऱ्या पाण्याच्या प्रश्नासाठी गुरुवारी (दि.२६) आंदोलन सुरू केले. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने आणि थेट काम सुरू केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शहराच्या पश्चिम भागातील बाजीरावनगर भागातील सुमारे ५० घरांना पिण्याच्या पाण्याची सुविधा गेल्या दोन वर्षांपासून सुटलेली नाही. याबाबत अनेकदा मागणी केली. मात्र, प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत होते. अखेर गुरुवारी या प्रभागातील नागरिकांना बरोबर घेत नगरसेवक प्रा. शिंदे यांनी सभागृहात घरपट्टी वाढ विषयावर बैठक चालू असताना सभागृहाच्या दरवाज्यात ठाण मांडले. यावेळी महिला सहभागी झाल्या होत्या. पाणीपुरवठा अधिकारी याकामी निष्काळजीपणा करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. आंदोलनामध्ये युवा सेनेचे लक्ष्मण गवळी, मीनाक्षी निकम, वृषाली आहेर, ज्योती पाबळे, मनीषा लाड, शकुंतला थोरात, विनता जेजुरकर, मंगल वाघ, मंगला जाधव, नंदा पिरनाईक, गणेश भालके, सुनील विधे, बाळू गवळी, रमेश गवळी, मयूर मोरे, सखाराम गादीकर, संतोष परळकर, अनिल नागपुरे, विठ्ठल गवळी, तुळशीराम पिरनाईक, विलास चव्हाण आदींचा समावेश होता.