सातपूर परिसरात नारी शक्तीचा सन्मान

By admin | Published: March 9, 2016 11:45 PM2016-03-09T23:45:56+5:302016-03-09T23:57:23+5:30

मोफत स्त्रीरोगनिदान शिबिर

Women's respect for women in Satpur area | सातपूर परिसरात नारी शक्तीचा सन्मान

सातपूर परिसरात नारी शक्तीचा सन्मान

Next

 सातपूर : परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांमध्ये जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला. सद्गुरुनगर येथील भक्ती मॅटर्निटी होम आणि शिवसेना प्रणीत डॉक्टर आघाडी, महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी मोफत स्त्रीरोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. अमोल वाजे, डॉ. मोहिनी वाजे यांच्या या आरोग्य शिबिरात हिमोग्लोबीन, इ.सी.जी, वंध्यत्व निवारण, सुलभ प्रसूती, स्तनातील गाठी, स्त्रीरोग याविषयांवर डॉ. हर्षदा कापडणीस, डॉ. अजय कापडणीस, डॉ. नितीन वाडेकर, डॉ. उल्हास कुटे आदिंनी मागर्दर्शन केले. यावेळी ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्यामला दीक्षित, अलका गायकवाड, सुनंदा ठाकरे, ज्योती देवरे आदि उपस्थित होते.
प्रबुद्धनगर येथे नारी शक्ती संघटना, आर्थिक विकास महामंडळ आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिलांचे बचत गट तयार करणे, त्यांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे, कौटुंबिक अडचणी, महिलांवरील अन्याय, अत्याचार तसेच महिला सक्षमीकरण याविषयावर समन्वयक अतिक शेख, बजरंग शिंदे, मंगला धोंगडे आदिंनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी अनुसया भुसारे, ज्योती शिंदे, सीमा तपासे, नंदिनी नेटवटे, मनीषा गायकवाड आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़़
विद्यानिकेतन शाळा क्र. ८ मध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. शाळेतील महिला शिक्षकांचा मुख्याध्यापक कैलास ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ज्योती गर्दे, पल्लवी भुसे, शारदा सोनवणे आदिंनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सुरेश खांडबहाले, भास्कर राठोड, सुरेश चौरे, पुनाजी मुठे आदि शिक्षकांसह पालक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Women's respect for women in Satpur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.