डिजिटल प्रशिक्षण वर्गाला महिलांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 10:12 PM2020-01-03T22:12:56+5:302020-01-03T22:13:24+5:30
वागदर्डी येथील शिवतीर्थ सेवाभावी संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्य महिला आयोग डिजिटल प्रशिक्षण अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य रोहिणी नायडू या होत्या.
चांदवड : वागदर्डी येथील शिवतीर्थ सेवाभावी संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्य महिला आयोग डिजिटल प्रशिक्षण अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य रोहिणी नायडू या होत्या.
रोहिणी नायडू यांनी बचतगटाच्या महिलांना मार्गदर्शन करताना महिला साक्षर झाल्या पाहिजे, बचतगटाचा भरणा मोबाइलद्वारे केला पाहिजे, बचत गटातील महिलांना मोबाइलच्या माध्यमातून शासकीय योजनेचे लाभ घेऊ शकता. राज्य महिला आयोग महिलांसाठी काम करते व ट्रेनिंग देऊन बचतगटाच्या महिलांसाठी काम करते. महिलांचे जीवनमान उंचावणे, कायद्याची माहिती होऊन पीडित महिलांना न्याय मिळावा. अशी माहिती बचतगटाच्या महिलांना नायडू यांनी दिली. महिला आयोग प्रशिक्षक मानसी रायकर यांनी मार्गदर्शन करताना स्मार्ट फोनद्वारे प्ले अॅपमधून आपले सरकार अॅप घेऊन सरकारच्या योजनेची माहिती दिली. इंटरनेटचा वापर कसा करावा याची माहिती देण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, रुपाली नेर, वानखेडे, उत्तम आवारे, शिवतीर्थ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष वाल्मीक उराडे, विठ्ठल चव्हाण, प्रकाश पवार, श्यामकांत गरुड, जालिंदर चव्हाण, आत्माराम खताळ, वाजे व महिला बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या.