महिला सुरक्षितता धोक्यात; एका दिवसात विनयभंगाच्या सहा घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 04:35 PM2019-05-04T16:35:53+5:302019-05-04T16:39:58+5:30
शहरात एकाच दिवसात सहा महिला, मुलींचा विनयभंग झाल्याच्या घटना शुक्रवारी (दि.३) उघडकीस आल्या आहेत. यावरून शहर व परिसरात महिलांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.
नाशिक : मागील महिन्यात विनयभंगाच्या तब्बल दहा घटना घडल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये असून गुरूवारी (दि.२) शहरात एकाच दिवसात सहा महिला, मुलींचा विनयभंग झाल्याच्या घटना शुक्रवारी (दि.३) उघडकीस आल्या आहेत. यावरून शहर व परिसरात महिलांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.
द्वारका परिसरातील बनकर चौकात एका पादचारी तरूणीचा पाठलाग करून दुचाकीस्वार तरूणाने पत्ता विचारण्याचा बहाणा करून तरूणीचा विनयभंग केल्याची घटना द्वारका परिसरात गुरूवारी (दि.२) घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात पिडित तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरूणी आपल्या मामाच्या घरी गेली होती. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास पिडित तरूणी घराकडे पायी जात असताना मोपेड दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात तरूणाने तरूणीची वाट रोखून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लज्जा उत्पन्न करणारे कृत्य भर रस्त्यात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अंधाराचा फायदा घेत संशयित दुचाकीवरून पसार झाला. याप्रकरणी त्याच्याविरूध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत राहणाºया नव्या पंडीत कॉलनीमधील एका महिलेच्या घरातील लॅन्डलाईन दुरध्वनीवर सातत्याने वेगवेगळ्या भ्रमणध्वनी क्रमांकावरून संपर्क साधत महिलेशी अश्लील भाषेत संभाषण साधत लज्जा उत्पन्न करणारे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पिडितेने दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीसºया घटनेत अंबडलिंकरोडवर एका मोटारीत संशयिताने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. चौथी घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. येथील नारायणबापूनगर परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ संशयित आरोपी कुलदीप यादव याने पिडित तरुणीला अश्लील भाषेत शिवीगाळ करत लज्जा उत्पन्न के ल्याप्रकरणी त्याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचवी घटना इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. संशयित प्रशांत दैतकर पाटील, सोनाली दैतकर पाटील, यमुना दैतकर पाटील, श्रेया सुर्यकांत प्रभू, सुर्यकांत शाम प्रभू यांनी मिळून पिडित तरूणीला शिवीगाळ करत अर्वाच्य भाषेत संवाद साधला. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार फिर्यादीच्या वडिलांनी दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.