महिला बचत गटाला मिळाला मिनी ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 04:02 PM2020-10-31T16:02:35+5:302020-10-31T16:04:12+5:30
सिन्नर: सिन्नर नगरपरिषद दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत स्थापन संत रोहिदास महिला स्वयंसहाय्यता बचत गटाला नाशिक जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या सामाजिक कल्याण योजना अंतर्गत ९० टक्के अनुदनातून स्वरूपात मिनी ट्रॅक्टर मिळाला आहे.
सिन्नर: सिन्नर नगरपरिषद दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत स्थापन संत रोहिदास महिला स्वयंसहाय्यता बचत गटाला नाशिक जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या सामाजिक कल्याण योजना अंतर्गत ९० टक्के अनुदनातून स्वरूपात मिनी ट्रॅक्टर मिळाला आहे.
सदर ट्रॅक्टर बचत गटाकडे प्राप्त झाल्यानंतर नगरसेवक सौ. चित्रा लोंढे यांचे हस्ते पूजन करण्यात आले. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील बचत गटातील सदस्यांची बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी व्हावी यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असतात. ज्या बचत गटात 80 टक्के पेक्षा अधिक सदस्य हे अनुसूचित जाती या प्रवर्गाचे असल्यास अशा बचत गटास जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या सामाजिक कल्याण योजना अंतर्गत ९० टक्के अनुदान (3 लाख 50 हजार रु पये) स्वरूपात मिनी ट्रॅक्टर दिला जातो. बचत गटाने स्व हिस्सा म्हणून १० टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे.
मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी संजय केदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांनी संत रोहिदास महिला स्वयंसहाय्यता बचत गटाला जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या सामाजिक कल्याण योजना अंतर्गत मिनी ट्रॅक्टर मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. गटाच्या अध्यक्षा मंगल जाधव व सचिव शोभा जाधव यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.
संत रोहिदास महिला स्वयंसहाय्यता बचत गटाला मिनी ट्रॅक्टर मिळाल्याबद्दल गटाच्या अध्यक्षा मंगला जाधव यांनी नाशिक जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरिसंग वसावे, कनिष्ट लिपिक शांतीलाल सावकार, मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी संजय केदार, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांचे आभार मानले. यावेळी वितरक उदय गोळेसर, गणेश जाधव, जयप्रकाश जाधव, शरद जाधव श्रावण वाघ, प्रकाश सांगळे, सागर लोंढे, कैलास सांगळे, अनुराधा लोंढे, संत रोहिदास महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अर्चना जाधव, विनता तुपे, आशा तुपे, सिमा साबळे, कल्पना म्हैसमाळे, जयश्री सोनवणे, पुजा लोंढे, यशोदा गायकवाड आदी उपस्थित होत्या.