ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिलांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:13 AM2021-02-14T04:13:52+5:302021-02-14T04:13:52+5:30

कालवीत सरपंचपदी संगीता अनवट कालवी ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिला राखीव असल्याने सरपंचपदी संगीता अनवट तर उपसरपंचपदी ज्ञानेश्वर अनवट यांची ...

Women's sway as Sarpanch of Gram Panchayat | ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिलांचा बोलबाला

ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिलांचा बोलबाला

Next

कालवीत सरपंचपदी संगीता अनवट

कालवी ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिला राखीव असल्याने सरपंचपदी संगीता अनवट तर उपसरपंचपदी ज्ञानेश्वर अनवट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून श्रीधर सानप व ग्रामसेवक बाळासाहेब कदम यांनी काम पाहिले. यावेळी ज्ञानेश्वर अनवट, वाल्मीक अनवट, सुवर्णा अनवट, संगीता अनवट, शांताबाई अनवट, बंडू पारधी, सुनीता पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

----

हिंगणवेढा सरपंचपदी राजू धात्रक

हिंगणवेढे ग्रामपंचायतीत भास्कर कराड व कृष्णा नागरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले होते. सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सरपंचपदी राजू धात्रक व उपसरपंचपदी मीरा विंचू यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून जगन्नाथ दगा सोनवणे व ग्रामसेवक ज्ञानेश्वर भोर यांनी काम पाहिले. यावेळी नवनिर्वाचित सदस्य सुनीता धात्रक, उषा वाघ, संजय मोरे हे उपस्थित होते. तर भास्कर कराड व ज्योती नागरे हे गैरहजर होते. गणपूर्तीसाठी चार सदस्यांची आवश्यकता होती. पाच सदस्य उपस्थित राहिल्याने गणपूर्ती पूर्ण झाली म्हणून निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली.

----

शिलापूरला मंदा गांगुर्डे सरपंच

शिलापूर ग्रामपंचायतीत दोन पॅनलमध्ये अटीतटीची लढत होऊन परिवर्तन पॅनलचे पाच तर नम्रता पॅनलचे चार उमेदवार विजयी झाले होते. सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने परिवर्तन पॅनलच्या मंदा गांगुर्डे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदी रमेश कहांडळ यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब जगताप यांनी काम पाहिले. यावेळी नवनिर्वाचित सदस्य पवन कहांडळ,लीलाबाई कहांडळ, छगन कहांडळ, योगिता कहांडळ, दुर्गा बोराडे, रेश्मा बर्वे, शैला कहांडळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

------

चांदगिरीत दोन्ही पदांवर पुरुष

चांदगिरी ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने महेंद्र हांडगे हे एकमेव उमेदवार सरपंचपदासाठी पात्र असल्याने त्यांची निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदी बिनविरोध झालेले रामहरी कटाळे यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणुन एम.एम. कांगणे यांनी काम पाहिले. यावेळी रमेश आप्पा कटाळे, अशोक कटाळे, किरण कटाळे, कृष्णा बागुल, शिवाजी वांजूळ, धनाजी कटाळे, रामकृष्ण कटाळे, बंडू मोरे, रामनाथ मोरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

जाखोरी सरपंचपदी मंगला जगळे, तर उपसरपंचपदी प्रकाश पगारे

जाखोरीत ९ जागांसाठी दोन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. विश्वास कळमकर यांच्या नेतृत्वाखालील ग्रामसमृद्धी पॅनलने पाच जागांवर विजय मिळवून आपले वर्चस्व सिध्द केले. विश्वास कळमकर, प्रकाश पगारे, चंद्रभान पवार, ज्योती पवार, मंगला जगळे हे विजयी झाले. जनसेवा पॅनलचे राहुल धात्रक, जया चव्हाण, उज्ज्वला जगळे हे तीन उमेदवार विजयी झाले. तर एक अपक्ष स्री उमेदवार अपर्णा कळमकर विजयी झाल्या. येथील सरपंचपद सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने व इच्छुकांची संख्या अधिक असल्याने गुप्त मतदान पद्धतीने निवड करण्यात आली. मंगला युवराज जगळे यांना ९ पैकी ६ मते मिळाल्याने त्यांची सरपंचपदी निवड झाली.तर उपसरपंपदी प्रकाश पगारे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी प्रशांत कांबळे यांनी काम पाहिले, तर ग्रामसेवक उत्कर्ष पाटील, तलाठी योगेश वाघ, किशोर बाचकर यांनी सहकार्य केले. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांसह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Women's sway as Sarpanch of Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.