महिला तलाठी बदलीप्रकरणी आज मॅटमध्ये सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:18 AM2021-08-23T04:18:13+5:302021-08-23T04:18:13+5:30
येवला प्रांताधिकाऱ्यांनी बदली नियमांचा भंग करून आपली आन्यायकारक बदली केली असल्याचा आरोप करीत महिला तलाठीने मॅट कोर्टाकडे दाद मागितली ...
येवला प्रांताधिकाऱ्यांनी बदली नियमांचा भंग करून आपली आन्यायकारक बदली केली असल्याचा आरोप करीत महिला तलाठीने मॅट कोर्टाकडे दाद मागितली आहे. मागील आठवड्यात त्यांनी बाबतची तक्रार नोंदविली होती. या बदली प्रकरणावरूनच प्रांताधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याने महिला तलाठी बदलीप्रकरणी जिल्ह्यात गाजत आहे.
प्रांताधिकाऱ्यांनी आन्यायकारक बदली करतानाच बदली रद्द करण्यासाठी आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप संबंधित महिला तलाठीने केलेला आहे. तर अन्य एका महिला कर्मचारीने दफ्तर तपासणीसाठी प्रांताधिकाऱ्यांनी साठ हजार रूपयांची मागणी केल्याचा आरोपदेखील चर्चेत आलेला आहे. याप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांनी अद्याप मौन बाळगले आहे. दरम्यान, मुंबईत न्यायमूर्ती मेधा गाडगीळ यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी होणार असून या सुनावणीत नेमके काय होणार याकडे महसूल विभागाचे लक्ष लागून आहे.