महिलांचे व्हॉट््सअॅप अकाउंट हॅक
By admin | Published: June 30, 2017 12:54 AM2017-06-30T00:54:09+5:302017-06-30T00:54:18+5:30
नाशिक : दोन महिला डॉक्टर्सचे व्हॉट््सअॅप अकाउंट हॅक करून हॅकरने संबंधित महिलांच्या ग्रुपमधील अनेकांशी अश्लील फोटो शेअर केल्याचा प्रकार घडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील दोन महिला डॉक्टर्सचे व्हॉट््सअॅप अकाउंट हॅक करून हॅकरने संबंधित महिलांच्या ग्रुपमधील अनेकांशी अश्लील चॅटिंग आणि फोटो शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर प्रकार केवळ या दोघींच्याच बाबतीत झाला आहे असे नव्हे तर अशाप्रकारचे अकाउंट हॅक झाल्याच्या शहरात सुमारे २८ तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्याने या गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हॅकरने डॉक्टर्स, मॉडेल्स, सायकलिस्ट ग्रुपमधील महिलांना टार्गेट केले आहे. पोलिसांकडे प्राप्त तक्रारींमध्ये २६ महिलांचा समावेश आहे.
सदर महिलांच्या व्हॉट््सअॅप अकाउंटवरून त्यांचा मित्रपरिवार आणि परिचितांना अश्लील मेसेज तसेच व्हिडीओ क्लिप पाठविल्या जात असल्याचे समजल्यानंतर आपले व्हॉट््सअॅप अकाउंट हॅक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. बुधवारी दिवसभर अशाप्रकारच्या सुमारे ३० ते ४० तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या. आपल्या अकाउंटवरून तसेच आपणाला येणाऱ्या अश्लील एसएमएसविषयी महिलांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली असून, याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांचे जबाब घेतले आहेत. याप्रकरणी डॉ. मनीषा रौंदळ यांनी सांगितले की, मैत्रिणीच्या व्हॉट््सअॅप मॅसेजला उत्तरे देता देता तिने मागणी केल्याप्रमाणे तिला मोबाइलवर आलेली लिंक शेअर केली आणि येथेनूच व्हॉट््सअॅप बंद झाले.