पाण्यासाठी महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 05:07 PM2017-07-26T17:07:14+5:302017-07-26T17:07:40+5:30

´ff¯¹ffÀffNXe ¸fdWX»ffa¨ff ¸fû¨ffÊ

women,wandering,for,water | पाण्यासाठी महिलांचा मोर्चा

पाण्यासाठी महिलांचा मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क :
सिडको : सध्या पावसाळ्याचे दिवस असून, धरणातही मुबलक पाणीसाठी असताना प्रभाग ३१ मध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांना अत्यंत कमी दाबाने व अपुºया स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याने आज प्रभागाचे नगरसेवक व महिलांनी थेट पाणीपुरवठा अधिकाºयांच्या दालनात ठिय्या मांडत पाणीप्रश्न मार्गी लावावेत, असे अधिकाºयांना सांगितले.
सिडको प्रभागात समाविष्ट असलेल्या प्रभाग ३१ मध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपुºया स्वरूपात पाणीपुरवठा होत असल्याने याबाबत महिलांनी प्रभागाचे नगरसेवक पुष्पा आव्हाड व साहेबराव आव्हाड यांची भेट घेऊन पाणीप्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नगरसेवक आव्हाड यांनी महिलांना बरोबर घेत मनपा सिडको विभागीय कार्यालयाकडे मोर्चा वळविला व पाणीपुरवठा अधिकारी संजय बच्छाव यांच्या दालनात जाऊन याबाबत त्यांना जाब विचारला. नगरसेवक आव्हाड यांनी अधिकाºयांना प्रभागातील सदिच्छानगर, वासननगर, रविकिरण सोसायटी, रामनगर, श्रीजी पॅलेस यांसह प्रभाग ३१ मध्ये बहुतांशी ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून, पाऊस चांगला झाल्याने धरणातही मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने महिलावर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. या भागातील काही नागरिकांना सकाळी तर काहींना दुपारी पाणीपुरवठा केला जात असला तरी काम करणाºया कर्मचाºयांचा समन्वय होत नसल्याने व कामचुकारपणामुळे पाणीसाठा मुबलक असतानाही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

Web Title: women,wandering,for,water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.